-
पोट साफ न होणे ही साधी समस्या वाटू शकते; पण बऱ्याच दिवसांनीही पोट साफ न झाल्यास ते बद्धकोष्ठतेचे लक्षण असू शकते. सतत मल साफ न होणे शरीरात अस्वस्थता निर्माण करू शकते.
-
बद्धकोष्ठतेमुळे पोट फुगणे, पोटदुखी, मळमळ किंवा हलकी उलटी होणे ही सामान्य लक्षणं दिसतात. हळूहळू पचनही कमी होऊ शकते.
-
जर पोटात मल जमा झाला आणि तो बाहेर न येता तसाच राहिला, तर याला फेकल इम्पॅक्शन म्हणतात. ही स्थिती गंभीर ठरू शकते आणि त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
-
बद्धकोष्ठतेमुळे मल कडक आणि कोरडा होतो. त्यामुळे पोट साफ होण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करावे लागतात, ज्यामुळे त्रास वाढतो.
-
बद्धकोष्ठतेमुळे फक्त पोटात त्रास नाही, तर हृदयावरही परिणाम होऊ शकतो. शरीरात तणाव आणि सूज निर्माण होते. त्यामुळे शरीराला अतिरिक्त त्रास होतो.
-
बद्धकोष्ठता टाळण्यासाठी दररोज पुरेसे पाणी प्यावे. तसेच फळे, भाज्या, डाळी आणि संपूर्ण धान्य खाणे खूप आवश्यक आहे. कारण- यात फायबर असते, जे पचन सुधारते.
-
हलका व्यायाम, चालणे किंवा स्ट्रेचिंग पचन प्रक्रिया सुधारण्यासाठी मदत करते. दीर्घकाळ बसून काम करणाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे.
-
काही लोकांसाठी स्टूल सॉफनर किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेणे आवश्यक असते. स्वतःहून जास्त औषध घेणे टाळावे.
-
पोटात तीव्र दुखणे, उलटी, गॅस न जाणवणे किंवा जास्त फुगणे यांसारखी गंभीर लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लवकर लक्ष न दिल्यास गंभीर समस्या टाळता येतात. (सर्व फोटो सौजन्य : फ्रीपिक)

बापरे! मुंबईकरांनो दादरला खरेदीला जाताय? थांबा… ‘हा’ धक्कादायक VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल