-
पाणी प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त साखर मूत्रमार्गे बाहेर टाकण्यास मदत होते आणि डिहायड्रेशन टाळता येते. (सर्व फोटो सौजन्य : Pexels)
-
दिवाळीचा फराळ खाल्ल्यानंतर किमान २० ते ३० मिनिटे वेगाने चाला.
-
रात्री १ चमचा मेथीचे दाणे एका ग्लास पाण्यात भिजवा. सकाळी रिकाम्या पोटी ते दाणे चावून खा आणि ते पाणी प्या.
-
चिमूटभर दालचिनीची पावडर चहा किंवा कोमट पाण्यात मिसळून घ्या.
-
रोज सकाळी रिकाम्या पोटी ताज्या कारल्याचा थोडासा रस प्या.
-
सकाळच्या वेळी आवळा आणि हळदीचा रस घेणे फायदेशीर ठरू शकते.
-
एकाच वेळी जास्त खाण्याऐवजी, दिवसातून थोडे-थोडे आणि वेळापत्रकानुसार खा.
-
येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साखरेची पातळी खूप वाढली असल्यास किंवा मधुमेह असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.

ज्येष्ठ अभिनेते असरानी यांची शेवटची पोस्ट काय होती? इन्स्टाग्रामवर लिहिला ‘तो’ संदेश, त्यानंतर आली निधनाची बातमी