-
तोंडाचे आरोग्य हे फक्त दातांच्या स्वच्छतेपुरतेच मर्यादित नसते. तोंडाला दुर्गंधी येणे, हिरड्यांमधून रक्त येणे, दात कमजोर होणे या सगळ्या समस्यांबरोबर सतत तोंड येणे ही समस्या तर अगदी सामन्याचा आहे. एखादा गोड पदार्थ खाल्ला की, अनेक जणांना हमखास तोंड येते. यामुळे बोलण्यास, खाण्यास आणि पिण्यास देखील त्रास होतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
यासाठी अनेकदा आपण डॉक्टरांकडे धाव घेतो. पण, सतत डॉक्टरकडे जाण्यापेक्षा या समस्येवर काही घरगुती उपचार फायदेशीर ठरतात. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये आजीने काही घरगुती उपाय सांगितले आहेत; जे कदाचित तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.(फोटो सौजन्य: @इन्स्टाग्राम / @aapli_aaji)
-
१. साजूक तूप – तोंड आलेल्या ठिकाणी थोडंसं तूप लावलं की, जखम बरी होते.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
२. हिरवी कोथिंबीर – २ ते ३ वेळा दिवसातून बारीक चावून खायची.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
३. सुखं खोबरं – एकदम बारीक चावून खायचे..(फोटो सौजन्य: @Freepik)
-
४. इलायची आणि मध – इलायची पावडरमध्ये मध घालून मिक्स करा आणि तोंड आलेल्या ठिकाणी लावून घ्या.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
५. हळद आणि मध – हळद आणि मध यांचे मिश्रण जखम लावलेल्या ठिकाणी लावा.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
मसालेदार खाऊ नये आणि सतत तोंड येत असेल तर मेडिकलमधून व्हिटॅमिन्सच्या गोळ्या घ्या असे त्यांनी व्हिडीओत सांगितले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @aapli_aaji या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम / @aapli_aaji)

PM Modi on Sanjay Raut: संजय राऊत यांच्या गंभीर आजाराच्या पोस्टवर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया; म्हणाले, “प्रार्थना करतो की…”