-
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार सकाळी नाश्त्यात पपईवर थोडं लिंबू पिळून खाल्ल्यास शरीराला अनेक फायदे होतात. हे संयोजन पचन सुधारतं, शरीरातील विषारी द्रव्यं बाहेर टाकतं आणि मेटाबॉलिझम वाढवतं, त्यामुळे शरीर हलकं, ताजेतवाने आणि ऊर्जावान राहते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
पपई आणि लिंबामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. हे शरीरातील पांढऱ्या रक्तपेशींचे उत्पादन वाढवून संसर्गांपासून बचाव करते. पपईतील अँटिऑक्सिडंट्स शरीराला ताजेतवाने ठेवतात आणि रोगांपासून संरक्षण करतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
पचन सुधारते व बद्धकोष्ठतेपासून आराम देते
रिकाम्या पोटी पपई खाल्ल्याने पचन सुधारते. पपईतील पपेन एन्झाइम प्रथिनांचे विघटन करून पोटाला आराम देते. लिंबातील सॅट्रिक अॅसिड पचनरस वाढवून पोट स्वच्छ ठेवते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
हृदयाचे रक्षण करते
पपईतील पोटॅशियम आणि फायबर रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतात. लिंबाचा सुगंध आणि त्यातील घटक हृदयाचे ठोके नियमित ठेवतात व ताणतणाव कमी करतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
यकृत (लिव्हर) निरोगी ठेवते
पपई आणि लिंबू दोन्ही यकृतासाठी औषधासारखे आहेत. ही दोन्ही फळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकतात. लिंबातील अॅसिड्स आणि पपईतील अँटिऑक्सिडंट्स यकृताचे कार्य सुधारतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
त्वचा बनवते उजळ आणि चमकदार
पपईतील नैसर्गिक एन्झाइम्स त्वचेला मऊ व स्वच्छ ठेवतात. लिंबातील व्हिटॅमिन C त्वचेतील कोलेजन टिकवून ठेवते, त्यामुळे सुरकुत्या कमी दिसतात आणि चेहरा तजेलदार दिसतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
कॅन्सरपासून संरक्षण
पपईतील लाइकोपीन आणि बियांमधील घटक कॅन्सर पेशींची वाढ थांबवतात. नियमित सेवन केल्यास यकृत, प्रोस्टेट आणि आतड्यांच्या कॅन्सरपासून बचाव होऊ शकतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
पपईची पानेही आहेत औषधी
पपईच्या पानांत पपेन आणि कायमो-पपेन एन्झाइम्स असतात, जे पचन सुधारतात आणि प्लेटलेट्स वाढवतात. डेंग्यू किंवा मलेरियाच्या वेळी पपई पानांचा रस उपयुक्त ठरतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
(टीप: येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या…) (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणात उपमुख्यंमत्री अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी…”