-
संतुलित आहारात फळांचा नेहमीच मोठा वाटा राहिला आहे. आयुर्वेदापासून आधुनिक वैद्यकशास्त्रापर्यंत फळांचे आरोग्यावरचे उपयोग सिद्ध झाले आहेत. नाश्त्यात फळे घेतल्याने दिवसभर ऊर्जा टिकून राहते. स्मूदी, शेक, सॅलेड किंवा डेझर्ट — फळांचे अनेक प्रकारे सेवन करता येते. सामान्य फळांमध्ये सफरचंद, पपई, केळी, पेरू, डाळिंब आणि संत्री यांचा समावेश होतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
पेरूचे पोषक घटक
१०० ग्रॅम पेरूमध्ये सुमारे ६८ कॅलरीज, ५.४ ग्रॅम फायबर, २२८ मिग्रॅ व्हिटॅमिन C, ०.९ ग्रॅम हेल्दी फॅट्स, २.६ ग्रॅम प्रोटीन आणि ४१७ मिग्रॅ पोटॅशियम असते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
पेरूचे आरोग्यदायी फायदे
पेरू हा व्हिटॅमिन C चा उत्तम स्रोत असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. अँटीऑक्सिडंट्समुळे सूज आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो. कमी कॅलरीज आणि जास्त फायबरमुळे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. तसेच LDL कोलेस्ट्रॉल कमी करण्यात आणि रक्तदाब संतुलित ठेवण्यात मदत करू शकतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
केळीचे पोषक घटक
USDA नुसार १०० ग्रॅम पिकलेल्या केळ्यामध्ये ८९ कॅलरीज, ०.३३ ग्रॅम फॅट, ० मिग्रॅ कोलेस्ट्रॉल, १ मिग्रॅ सोडियम, २२.८ ग्रॅम कार्बोहायड्रेट, २.६ ग्रॅम फायबर, १.०९ ग्रॅम प्रोटीन आणि ३५८ मिग्रॅ पोटॅशियम असते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
केळीचे आरोग्यदायी फायदे
केळी हा पोटॅशियमचा उत्तम स्रोत असून हृदयाचे आरोग्य व रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. नैसर्गिक साखर व कार्ब्समुळे त्वरित उर्जा मिळते, त्यामुळे नाश्ता किंवा प्री-वर्कआउटसाठी उत्तम मानले जाते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
केळ्याबद्दलचे संशोधन काय सांगते?
‘Antioxidant and anti-atherosclerotic potential of Banana’ या अभ्यासानुसार केळीमध्ये कार्ब्स, फायबर, प्रोटीन, ओमेगा फॅटी अॅसिड्स, पोटॅशियम, कॅरोटिनॉइड्स, व्हिटॅमिन C-E आणि अनेक पॉलिफेनॉल्स आढळतात. हे घटक अँटीऑक्सिडंट व हृदयसंरक्षक म्हणून कार्य करतात. केळी व त्याचे पदार्थ आहारात घेतल्यास हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
पेरूबद्दलचे संशोधन काय सांगते?
‘Guava (Psidium guajava): Therapeutic and health potential’ या अभ्यासानुसार पेरूला अँटी-इन्फ्लेमेटरी, अँटी-हायपरटेन्सिव्ह, अँटी-ओबेसिटी, अँटीऑक्सिडंट, अँटीडायरियल आणि अँटीडायबेटिक गुणधर्म आहेत. पेरू दंत आरोग्यास मदत करतो आणि हिमोग्लोबिन वाढवण्यासही उपयुक्त ठरतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
आयुर्वेद काय सांगतो?
आयुर्वेदनुसार पेरू पित्त आणि कफ संतुलित ठेवतो, त्यामुळे अॅसिडिटी किंवा मंद पचन असलेल्या लोकांसाठी फायदेशीर. तर केळी वात कमी करणारे पोषक असून रात्री खाणे टाळावे, कारण त्यामुळे कफ वाढून पचन धीमे होऊ शकते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
पेरू वि. केळी – नाश्त्यासाठी काय उत्तम?
दोन्ही फळे उपयुक्त आहेत. पचन सुधारायचे असेल, वजन कमी करायचे असेल किंवा हलका, फायबरयुक्त नाश्ता हवा असेल तर पेरू उत्तम. जलद ऊर्जा, स्नायूंसाठी आधार आणि पटकन पचणारा नाश्ता हवा असेल तर केळी चांगला पर्याय. दिनचर्येनुसार निवड बदलू शकते. सकाळी पेरू योग्य, तर धावपळीच्या किंवा वर्कआउटच्या दिवशी केळी अधिक फायदेशीर. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
Video: सूरज चव्हाणने लग्नाआधी नवीन घरात केला गृहप्रवेश! प्रशस्त खोल्या, आकर्षक इंटिरियर, पाहा बंगल्याची झलक