-
राज्यभरातील आठ केंद्रांवर सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत व भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सहकार्याने 'लोकसत्ता लोकांकिका' ही राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा होत आहे. या स्पर्धेची सुरुवात रविवारी पुणे विभागाच्या प्राथमिक फेरीपासून झाली. (छाया – संदीप दौंडकर)
-
पुण्यातील प्राथमिक फेरीच्या स्पर्धा केंद्रावर मोठय़ा उत्साहात स्पर्धेला सुरुवात झाली. (छाया – संदीप दौंडकर)
-
पुणे शहराबरोबरच सोलापूर, इस्लामपूर, बारामती या ठिकाणांहून महाविद्यालये या स्पर्धेत सहभागी झाली होती. बारा महाविद्यालयांच्या संघानी या स्पर्धेत आपला आविष्कार सादर केला. (छाया – संदीप दौंडकर)
-
सामाजिक विषयांवर विद्यार्थ्यांनीच लिहिलेल्या संहिता हे या स्पर्धेचे वैशिष्टय़ ठरले. (छाया – संदीप दौंडकर)
-
डोंबाऱ्याचा खेळ, गुन्हेगारांकडे पाहण्याची सामाजिक मानसिकता, जादूचे प्रयोग करणाऱ्यामागे दडलेला माणूस, दुभंग व्यक्तिमत्त्व (मल्टीपल पर्सनॅलिटी डिसॉर्डर) यांसारख्या विषयांची मांडणी एकांकिकांमधून करण्यात आली. (छाया – संदीप दौंडकर)
-
कुठल्याही मोठ्या नेपथ्याशिवाय केवळ संगीत आणि जुजबी सामुग्रीच्या जोरावर महाविद्यालयांसमोर प्राथमिक फेरीत आपला नाट्यप्रयोग सादर करण्याचे आव्हान होते. (छाया – संदीप दौंडकर)
-
भारताची प्रतिज्ञा नेमकी लिहिली कुणी, या विषयावर प्रकाशझोत टाकणाऱ्या एकांकिकेसह आवडत्या खेळाडूला भेटण्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी एका चाहत्याने केलेली गंमत अशा अगदी आसपास दिसणाऱ्या घटनांतील नाटय़ हेरून विद्यार्थ्यांनी त्याचे सादरीकरण केले. (छाया – संदीप दौंडकर)
-
सामाजिक वास्तव, त्याच्याकडे पाहण्याचे वेगळे दृष्टिकोन असे थोडेसे गंभीर झालेले वातावरणही या युवा रंगकर्मीनीच हलके केले. (छाया – संदीप दौंडकर)
-
भारलेल्या वातावरणात प्रसिद्ध अभिनेते सुनील बर्वे यांनी हजेरी लावली आणि स्पर्धकांच्या उत्साहाला आनंदाचे भरते आले. (छाया – संदीप दौंडकर)
-
स्पर्धकांमध्ये रंगलेल्या चुरशीने निकालाची उत्कंठा वाढत गेली. (छाया – संदीप दौंडकर)
-
'लोकसत्ता लोकांकिका' स्पर्धेसारख्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना व्यक्त होण्यासाठी मिळणारी संधी ही त्यांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. विविध घटना, विषय यांच्याकडे वेगळ्या नजरेतून पाहणाऱ्या तरूणाईच्या आविष्कारांमधून नवे काही पाहण्याची आणि शिकण्याचीही संधी मिळाली, असे मत स्पर्धेचे परीक्षक आणि उपस्थितांनी व्यक्त केले. (छाया – संदीप दौंडकर)
-
पुणे विभागाच्या प्राथमिक फेरीसाठी प्रसन्नकुमार अकलुजकर, सुषमा जोग-सावरकर, अश्विनी परांजपे आणि प्रवीण तरडे या दिग्गजांनी परीक्षण केले. (छाया – संदीप दौंडकर)
-
महाराष्ट्रातील आठ केंद्रांवरून निवडलेल्या उत्कृष्ट आठ एकांकिकांमधून सर्वोत्कृष्ट एकांकिका, म्हणजेच महाराष्ट्राची 'लोकांकिका' निवडण्यात येणार आहे. (छाया – संदीप दौंडकर)
-
अस्तित्व संस्थेच्या सहकार्याने होणाऱ्या 'लोकसत्ता लोकांकिके'साठी इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रायोजक म्हणून 'झी मराठी' ची साथ मिळाली आहे. (छाया – संदीप दौंडकर)
-
'लोकसत्ता लोकांकिका' स्पर्धेत केसरी ट्रॅव्हल्स, बँक ऑफ महाराष्ट्र आणि इंडियन ऑईल यांचाही आयोजनात मोठा वाटा आहे. (छाया – संदीप दौंडकर)

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली