-
मुसळधार पावसामुळे जवळपास संपूर्ण चेन्नई शहरात सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठले असून, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तामिळनाडू सरकारने शाळा, महाविद्यालयांना तातडीची सुटी जाहीर केली असून, अनेक कारखाने आणि खासगी कार्यालयेही बंद ठेवण्यात आली आहे. पावसामुळे विमानतळावरही गुडघ्यापर्यंत पाणी साठल्यामुळे विमान उड्डाणेही स्थगित करण्यात आली आहेत. बुधवारीही चेन्नई, कांचीपुरम, तिरुवल्लूरमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पावसामुळे विविध ठिकाणी अडकलेल्यांच्या सुटका करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकातील जवान, लष्कराचे जवान यांची मदत घेण्यात येते आहे. (सर्व छायाचित्रे – पीटीआय)
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-

Independence Day 2025 : खासगी नोकरी करणाऱ्यांना सरकार १५ हजार रुपये देणार! केंद्राची मोठी योजना आजपासून सुरू; पंतप्रधान मोदींची घोषणा