-    करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या केंद्र सरकारनं सर्वांना बाहेर पडताना मास्क वापरणं बंधनकारक केलं आहे. आपण साध्या मास्कचाही वापर करू शकते असं सरकारनं सांगितलं आहे. 
-    परंतु सध्या अनेक जण मास्कला व्हॉल्व्ह म्हणजेच छिद्र असलेलं N95 मास्क वापरताना दिसतात. परंतु या विरोधात सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. 
-    या मास्कमुळे करोना विषाणूचा प्रसार रोखण्यास मदत होत नाही आणि करोना महामारी रोखण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांच्या हे विरोधात असल्याचं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. 
-    आरोग्य मंत्रालयाच्या आरोग्य सेवा महासंचालक राजीव गर्ग यांनी आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना यासंदर्भात एक पत्र लिहलं आहे. अधिकृत आरोग्य कर्मचाऱ्यांऐवजी लोक N95 मास्कचा अयोग्य वापर करतात, विशेषत: त्याचा ज्यात श्वासोच्छवासाठी एक व्हॉल्व लावण्यात आला आहे. 
-    व्हॉल्व्ह असलेले N95 मास्क करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी उचललेल्या पावलांच्या विरोधात आहे. यामुळे विषाणून मास्कच्या बाहेर पडण्यास प्रतिबंध होत नाही. हे रोखण्यासाठी संपूर्ण तोंड बंद होईल अशाच प्रकारच्या मास्कचा वापर करावा आणि N95 मास्कचा अयोग्य वापर थांबवण्यासाठी संबंधितांना सूचना करण्याचं आवाहनही गर्ग यांनी केलं आहे. 
-    गेल्या काही दिवसांपासून लोकांमध्ये N95 मास्कचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. 
-    तसंच गेल्या काही दिवसांपासून देशात करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच केंद्राची ही सूचना महत्त्वाची मानली जात आहे. सरकारच्या या आदेशानंतर व्हॉल्व्ह नसलेल्या मास्कचा वापर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
-    गेल्या काही दिवसांपासून देशातील करोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशातील करोनाबाधितांची संख्या ११ लाखांच्या पुढे गेली आहे. तर यामुळे आतापर्यंत २८ हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यूही झाला आहे. 
-    यापूर्वी केंद्र सरकारनं एप्रिल महिन्यात मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. यामध्ये त्यांनी घरात तयार केलेल्या मास्कचा वापर करण्यास सांगितलं होतं. 
-    तसंच घराबाहेर पडताना नाक आणि तोंड झाकलं देलं पाहिजे असंही सरकारनं म्हटलं होतं. तसंच मास्क रोज धुणं आणि मास्क ऐवजी घरातील कॉटनच्या कपड्याचाही वापर करता येऊ शकतो, अशंही केंद्र सरकारनं म्हटलं होतं. 
 
  ‘सर्व हिंदूंना अमेरिकेतून बाहेर काढा’, दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यामुळे FBI चे प्रमुख, भारतीय वंशाचे काश पटेल ट्रोल 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  