-
भारतात करोना प्रतिबंधक लसीकरण सुरु होऊन महिना उलटला आहे. पण अजूनही या व्हायरसची चिंता मिटलेली नाही.
-
लसीकरणानंतरही करोनाची साखळी तुटलेली नाही. भारतात पुन्हा एकदा हा आजार डोकं वर काढताना दिसतोय.
-
मुंबईसह महाराष्ट्रात करोना रुग्णवाढीचा वेग इतका आहे की, नागरिकांच्या डोक्यावर पुन्हा एकदा लॉकडाउनची टांगती तलवार आहे.
-
इंग्लंडला मागच्या दोन महिन्यांपासून करोनाच्या नव्या स्ट्रेनने चांगलेच हादरवून साडले होते. पण तिथे आता परिस्थिती हळूहळू सुधारत आहे.
-
याला कारण ठरले आहे लसीकरण. इंग्लंडमध्ये करोना प्रतिबंधक लसीकरण वेगात सुरु आहे.
-
त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये करोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण ७० टक्क्याने कमी झाले आहे.
-
अमेरिकेच्या फायझर कंपनीने विकसित केलेली करोना प्रतिबंधक लस प्रभावी ठरताना दिसत आहे. फायझर आणि बायोनटेकने मिळून विकसित केलेल्या लसीचा डोस घेणाऱ्या आरोग्य सेवकांमध्ये करोनाची लागण होण्याचे प्रमाण ७० टक्क्याने कमी झाले आहे.
-
संग्रहीत
-
इंग्लंडच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने केलेल्या डाटाच्या विश्लेषणातून ही माहिती समोर आलीय.
-
दोन वेगवेगळया विश्लेषणातून ही माहिती समोर आलीय. लसीकरणानंतर आरोग्य सेवक आणि ८० पेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांचा अभ्यास करुन हा निष्कर्ष काढण्यात आलाय.

“कर्म फिरून येतंच…” शेतात आलेल्या सापाला तरुणानं ट्रॅक्टरच्या चाकाखाली अक्षरश: चिरडून टाकलं; सापाचा VIDEO पाहून धक्का बसेल