-
संग्रहीत
-
जमावबंदीच्या पहिल्याच दिवशी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती.
-
काल सायंकाळपासूनच मुंबई पोलिसांनी जमावबंदीच्या कालावधीमध्ये नकाबंदी करण्यासाठीच्या हलचाली सुरु केल्या. शहरातील अनेक महत्वाच्या ठिकाणी पोलिसांच्या गाड्यांची अधिक प्रमाणात वर्दळ पहायला मिळाली. शहरात अनेक ठिकाणी प्रामुख्याने पोलिसांच्या गाड्यांचे आणि रुग्णवाहिकांचेच सायरन ऐकू येत होते.
-
१५ एप्रिलपर्यंत लागू करण्यात आलेल्या या जमावबंदीमध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांनी रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत एकत्र येण्यास बंदी आहे.
-
दुकाने, उपाहारगृहे, मॉल्स, चित्रपटगृहे, सागरी किनारे, बगीचे, उद्याने रात्री ८ वाजताच बंद करण्याच्या सुचना करण्यात आल्या असून पहिल्याच दिवशी या सुचनांचे कडोकोटपणे पालन होताना दिसून आलं.
-
गेट वे ऑफ इंडियावर रात्री आठनंतर एकही व्यक्ती दिसत नव्हती.
-
अनेक रस्त्यावर नाकाबंदी करण्यात आली होती. पोलीस प्रत्येक गाडीची तपासणी करताना दिसले. हा नाकाबंदीचा फोटो पश्चिम द्रुतगतीमार्गावरील आहे.
-
रविवारची रात्र आणि मरीन ड्राइव्ह हे मुंबईकरांची जणू अलिखीत समिकरणच मात्र. रविवारी जमावबंदीचा आदेश लागू झाल्यानंतर गस्त घालणारे पोलीस वगळता मरिन ड्राइव्हर कोणीच दिसत नव्हतं.
-
रविवारी राज्यात ४० हजार ४१४ नवे करोना रुग्ण आढळून आले. त्यापैकी केवळ मुंबईतील रुग्णांची संख्या ६ हजार ९२३ इतकी होती. त्यामुळेच राज्यभरामधील करोनाचा फैलाव रोखण्यासाठी ही जमावबंदी लागू करण्यात आलीय.
-
हा फोटो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळच्या परिसराचा आहे. येथेही मोजक्या गाड्या वगळता शुकशुकाटच दिसत होता.

कॅन्सरचा वाढता धोका उघड! प्रिया मराठेच्या मृत्यूनंतर समोर आले धक्कादायक आकडे, महिला अन् पुरुषांमध्ये झपाट्याने वाढतोय हा कर्करोग