-
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात करोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढत असून, उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
-
पुणे शहरात लॉकडाउन सदृश्य निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी याची माहिती दिली.
-
पुढील सात दिवस हॉटेल, बार आणि रेस्तराँ बंद राहणार असून, सायंकाळी ६ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. पुढील सात दिवसांसाठी पुण्यात काय सुरु राहणार आहे आणि काय बंद ते जाणून घेऊयात…
-
अत्यावश्यक सेवा वगळता संध्याकाळी सहा ते सकाळी सहा संचारबंदी असणार आहे.
-
शहरातील हॉटेल्स, रेस्तराँ, बार ७ दिवस बंद राहणार.
-
हॉटेल्स, रेस्तराँमधून होम डिलिव्हरी सेवा सुरू राहणार.
-
समारंभाला ५० आणि अंत्यसंस्काराला २० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्याचा निर्णय या आठावा बैठकीत घेण्यात आला.
-
शहरातील सर्व मॉल सात दिवस बंद राहणार आहेत.
-
मंडई आणि मार्केट यार्ड सुरू राहणार आहे. पण खरेदी करताना सोशल डिसटन्सींग पाळावे, अशा सूचना कऱण्यात आल्यात.
-
सर्व धार्मिक स्थळे, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम सात दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत.
-
गार्डन आणि जिम सकाळच्या वेळेत सुरू राहतील.
-
शाळा, कॉलेज ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
-
शाळा, कॉलेज बंद ठेवतानाच दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ देणार नाही याची काळजी प्रशासनाकडून घेतली जाणार आहे.
-
पीएमपीएलही सात दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.
-
उद्यापासून म्हणजेच तीन एप्रिलपासून या निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं बैठकीत निश्चित करण्यात आलं आहे. हे निर्बंध पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण जिल्ह्यात लागू होणार आहेत.
-
आता पुढील आठवडयात म्हणजे ९ मार्च रोजी शुक्रवारी निर्बंधांचा फेरआढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे. (सर्व फोटो: आशिष काळे, एक्सप्रेस फोटो आणि पीटीआयवरुन साभार)

Pakistan Flood : निसर्गाला हलक्यात घेऊ नका! एकाच कुटुंबातील ९ जण डोळ्यादेखत गेले वाहून, मन हेलावून टाकणारा Video आला समोर