-
काही आठवड्यांपूर्वीच तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे द्रमुकचे प्रमुख आणि एम. करुणानिधी यांचे पुत्र एम. के. स्टॅलिन सध्या चर्चेत आहेत. (सर्व फोटो ट्विटरवरुन साभार)
-
स्टॅलिन यांनी रविवारी (३० मे २०२१ रोजी) दोन रुग्णालयांमधील करोना वॉर्डला दिलेल्या भेटीमुळे सोशल नेटवर्किंगवर त्यांच्या नावाची चर्चा आहे.
-
कोईम्बतूरमधील एका रुग्णालयाला स्टॅलिन यांनी भेट दिली. यावेळी स्टॅलिन यांनी थेट पीपीई कीट घालून करोना वॉर्डामध्ये स्वत: जाऊन करोना रुग्णांची चौकशी केली.
-
सरकारी अधिकाऱ्यांनी यासंदर्भात इशारा दिला असतानाही मुख्यमंत्री म्हणून करोना रुग्णांची विचारपूस करण्यासाठी आणि त्यांचे हाल जाणून घेण्यासाठी माझी ही पहिलीच भेट असल्याने मी थेट वॉर्डमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचं स्टॅलिन यांनी स्पष्ट केलं.
-
स्टॅलिन यांनी ईएसआय रुग्णालय आणि कोईम्बतूरमधील सरकारी रुग्णालयातील करोना वॉर्ड्सला भेट दिली.
-
स्टॅलिन यांनीच या भेटीतील काही फोटो ट्विट करत, "मला सल्ला देण्यात आल्यानंतरही मी करोना वॉर्डमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. येथे काम करणाऱ्या डॉक्टरांना, पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांना, रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना धीर देण्यासाठी मी गेलेलो," असं म्हटलं आहे.
-
"औषधांबरोबरच रुग्णांना आधार देण्याची गरज आहे. असं केल्यास ते लवकर बरे होतील," असंही स्टॅलिन यांनी तमिळ भाषेत केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
-
मुख्यमंत्री म्हणून दिलेल्या या भेटीच्या माध्यमातून रुग्णांमध्ये आणि डॉक्टरांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यास सरकारला मदत होईल असंही स्टॅलिन म्हणाले.
-
स्टॅलिन यांनी अगदी पीपीई कीट घालण्यापासून ते वॉर्डमध्ये रुग्णांना भेटण्यापर्यंतचे अनेक फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेत.
-
तामिळनाडूमध्ये कोईम्बतूर हा करोनाचा सर्वाधिक फटका बसलेला जिल्हा आहे. शनिवारी येथे ३६०० नवे रुग्ण आढळून आल्यानेच मुख्यमंत्र्यांनी या जिल्ह्यातील रुग्णालयांमधील करोना वॉर्डसची पहाणी केल्याचं सांगण्यात येत आहे.
-
स्टॅलिन यांच्या या करोना वॉर्ड भेटीवरुन ट्विटवर स्टॅलिन समर्थक आणि भाजपा समर्थकांमध्ये हॅशटॅग वॉर रंगल्याचं पहायला मिळालं.
-
भाजपाने स्टॅलिन गो बॅक हा हॅशटॅग वापरुन स्टॅलिन यांच्या या भेटीला विरोध केला तर स्टॅलिन समर्थकांनी आय स्टॅण्ड विथ स्टॅलिन म्हणत त्यांनी दिलेली भेट योग्य असल्याचं म्हटलं.
-
स्टॅलिन यांनी करोना रुग्णांना कसे उपचार दिले जातात याची माहिती जाणून घेतली.
-
अनेक वॉर्डमध्ये स्टॅलिन तेथील कर्मचाऱ्यांना नमस्कार करतच प्रवेश करत होते.
-
स्टॅलिन यांना माहिती देण्यासाठी त्यांच्यासोबत डॉक्टरांची आणि तज्ज्ञांची एक टीम होती.
-
शनिवारी सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तामांग यांनी पीपीई कीट घालून करोना वॉर्डात जाऊन आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि रुग्णांना धीर दिला होता.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत आणि अमेरिकेमध्ये खूप…”