-
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने अलीकडच्या काळात घेतलेल्या अनेक निर्णयांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पक्षात एकाकी आणि कमकुवत केले आहे.
-
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, विनोद तावडे यांची राष्ट्रीय सरचिटणीस ते भाजप सरचिटणीस या पदावर झालेली बढती आणि महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी चंद्रशेखर बावनकुळे यांची उमेदवारी हे त्याचेच संकेत आहेत.
-
यामुळे २०२४च्या निवडणुकीत पक्षाचा चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीसांचे भविष्य अनिश्चित आहे.
-
भाजपानेच एकेकाळी त्यांना राष्ट्रीय मंचावर महाराष्ट्राचा नवा चेहरा, जाणकार, पुढच्या पिढीतील हिंदुत्ववादी नेता म्हणून पाहिले होते.
-
फडणवीस यांनी आपल्या कार्यकाळात माजी शिक्षणमंत्री तावडे यांना मंत्रिमंडळातून बाजूला सारले होते. अखेर २०१९च्या विधानसभा निवडणुकीसाठी तावडे यांना तिकीट नाकारण्यात आले.
-
तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आश्रयस्थान मानल्या जाणाऱ्या नागपुरातील माजी ऊर्जामंत्री आणि ओबीसी नेते बावनकुळे यांनाही तिकीट देण्यात आले नाही. यामुळे विदर्भात भाजपाला किमान सहा जागांचा फटका बसला.
-
याबाबत राजकारणात संयमाची किंमत असते. पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यासाठी हा एक मोठा संदेश आहे, असे विनोद तावडे यांनी इंडियन एक्सप्रेस सोबत बोलताना म्हटले आहे.
-
तर पक्षाने माझी प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. आता त्यांनी मला परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. भूतकाळात जे घडले त्याबद्दल मी दुःखी का व्हावे?, अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली आहे.
-
पण फडणवीसांनी बाजूला सारल्याने भाजपा सोडून राष्ट्रवादीत दाखल झालेले एकनाथ खडसे इतके मुत्सद्दी नव्हते.
-
भिंतीवरील लिखाण सर्वांसाठी स्पष्ट होते. फडणवीस यांनी घाणेरडे राजकारण केले, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले.
-
फडणवीसांनी आपले सर्व राजकीय प्रतिस्पर्धी संपवले. केंद्रीय नेतृत्वाचा विश्वास त्यांना लाभल्यामुळे हे घडले असे खडसे म्हणाले.
-
पण लवकरच गोष्टी उलगडू लागल्या. त्यामुळे छळाला कंटाळून मी भाजपा सोडला.
-
देवेंद्र फडणवीसांमुळेच मी भाजपा सोडला असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.
-
विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आल्यानंतर एकनाथ खडसे नाराज झाले होते. त्यांनी ही नाराजी वारंवार व्यक्तही केली होती
-
देवेंद्रजींनी ज्या ज्या मंत्र्यांवर आरोप झाले, त्या सर्वांना क्लीनचीट दिली. ते आमचे ड्रायक्लिनरच होते.
-
जो कुणी आला त्याला ड्रायक्लिनिंग करून लगेचच क्लीनचीट मिळायची.
-
फक्त मी आलो आणि ते क्लीनचीट देऊ शकले नाहीत, अशी टीका एकनाथ खडसेंनी या आधी केली होती.
-
केंद्रीय नेतृत्वांच्या निर्णयांवरून एक गोष्ट स्पष्ट होते पक्षाचा चेहरा म्हणून ओळख असलेल्या नेत्याचे पंख छाटण्यास सुरुवात त्यांनी केली आहे.

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL