पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यामध्ये सुरक्षेसंदर्भातील मोठी चूक झाल्याने मोदींची सभा रद्द करण्यात आलीय. मोदींचा ताफा अडवल्याने त्यांची सभाच रद्द करावी लागली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी पंतप्रधान मोदी भटिंडा येथे पोहोचले. तेथून ते हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे हेलिकॉप्टरने जाणार होते. -
मात्र पाऊस आणि खराब दृश्यमानतेमुळे हवाई मार्गाने जाण्याचा पर्याय टाळण्यात आला. तरी भटिंडामध्ये पंतप्रधानांनी हवामान स्वच्छ होण्याची सुमारे २० मिनिटे वाट पाहिली. मात्र, हवामानात सुधारणा न झाल्याने त्यांनी रस्त्याने राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट देण्याचे ठरले. हा रस्त्याचा प्रवास तब्बल २ तासांचा होता.
-
गृह मंत्रालयाने सांगितले की, डीजीपी पंजाब पोलिसांकडून आवश्यक सुरक्षा व्यवस्थेची आवश्यक ती सर्व पूर्तता करण्यात आल्याची खात्री केल्यानंतर ताफा हुसैनीवालाच्या दिशेने रवाना झाला.
-
मात्र हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकापासून सुमारे ३० किमी अंतरावर पंतप्रधानांचा ताफा फ्लायओव्हरवर पोहोचला तेव्हा काही आंदोलकांनी रस्ता अडवल्याचे दिसून आले.
-
पंतप्रधान मोदींना १५-२० मिनिटे फ्लायओव्हरवर अडकून राहावे लागल्याचे मंत्रालयाने सांगितलं आहे.
-
मोदींचा ताफ उड्डाणपुलावर अडकून पडला त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी गाड्यांना चारही बाजूने घेरलेलं होतं.
-
पंतप्रधानांच्या सुरक्षेतील ही मोठी चूक होती, असं गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आलंय.
-
पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी पुढे न जाता मागे फिरण्याचा निर्णय घेण्यात आला. (पहिले चार फोटो फाइल फोटो आहेत. उर्वरित फोटो आजचे असून सर्व फोटो एएनआयवरुन साभार)

करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case