-
“तुम्हाला सोडलं म्हणजे हिंदुत्व नाही सोडलं, तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही. तुम्ही काय हिंदुत्वाचं पेटंट घेतलेलं नाही.” (सर्व छायाचित्रे – संग्रहीत)
-
“देशामध्ये भाजपाने एक बनावट हिंदुहृदयसम्राट निर्माण करण्याचा प्रयत्न केला; तो फसला, लोकांनी झिडकारला.”
-
“हिंदुहृदयसम्राटांबद्दल तुम्हाला जर एवढं प्रेम आहे, तर मग नवी मुंबई विमानतळाला हिंदुहृदयसम्राटांचं नाव द्यायला तुमचा विरोध का?”
-
“हिंदुहृदयसम्राटांबद्दल जर तुम्हाला एवढं प्रेम असेल, तर मधल्या काळात मी बोललो की तुम्हीच(भाजपाने) त्यांच्या नावासमोर जनाब ही उपाधी लावण्याची नीच प्रयत्न केला होता.”
-
“एक गोष्ट लक्षात ठेवा, शिवसेना १९६६ मध्ये जन्माला आली तेव्हापासून शिवसेनेने आपला झेंडा, रंग, विचार, नेता कधीही बदलला नाही.”
-
“आम्ही उघडपणे सगळं करत आहोत, लपूनछपून काही करत नाही.”
-
“भगव्याच्या रक्षणासाठी आम्ही मैदानात उतरलेलो आहोत असं सांगितलं जातं, कोणता भगवा? हा छत्रपती शिवरायांच्या जो भगवा आहे तो खरा भगवा आहे, तुमच्या सोयीप्रमाणे त्याच्याबाजूला हिरवा, निळा, पिवळा, काळा लावाल आणि तो भगवा म्हणून म्हणाल तर तो भगवा आम्ही काही स्वीकारणार नाही.”
-
“तुमचा भगवा हा खरा भगवा नाहीच. अस्सल भगवा हा छत्रपती शिवरायांचा आणि साधुसंतांचा व आमच्या वारकऱ्यांचा भगवा आहे. त्याला दुसरा कोणताही रंग लागलेला नाही, हा आमचा भगवा.”
-
“आज देखील आमच्या मनात आमच्या होर्डिंग्जवर सर्वत्रच शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेच आहेत. दुसरा कोणताही नेता, विचार, रंग आमच्याकडे नाही.”
-
“आज आमच्या हृदयात आणि होर्डिंग्जवरती शिवसेनाप्रमुख तर आहेतच, पण तुमच्या किती होर्डिंग्जवर अटलजी आणि अडवाणी आहेत?”