-
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाच्या नावाखाली बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे.
-
बालगंधर्व रंगमंदिराची सध्याची वास्तू पाडून तेथे नाट्यसंकुल उभारण्यात येणार असून तीन विविध आसनक्षमतेची नाट्यगृहे, तीन कलादालने, खुला रंगमंच आणि उपाहारगृह बांधण्याचे नियोजित आहे.
-
उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनीही या नव्या प्रस्तावाला सहमती दर्शविल्याने येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष काम सुरू होण्याची शक्यता आहे.
-
याविरोधात आता कलाकार आक्रमक झाले असून त्यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे.
-
गुरुवारी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर बचाव समितीमार्फत घंटा नाद आंदोलन करण्यात आले
-
कलाकारांकडून यावेळी लावणीही सादर करण्यात आली.
-
यावेळी जेष्ठ अभिनेत्री रजनी भट आणि जयमाला इनामदार, उपाध्यक्ष विजय पटवर्धन, सुनील महाजन, शशी कोठावळे, योगेश सुपेकर, जितेंद्र वाईकर, शोभा कुलकर्णी, किरण गुजर आदी कलाकार उपस्थित होते.
-
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी यावेळी या निर्णया विरोधात आक्रमक भूमिका घेतली.
-
ज्यावेळी बालगंधर्वच्या कामाबाबत चर्चा झाली त्यावेळी १० कोटींचा खर्च होता. तो आता ११० कोटीवर घेऊन गेले आहेत. यामध्ये नेमकं काही तरी वेगळं दिसत आहे, असे मेघराज राजे भोसले म्हणाले.
-
याचे कशा प्रकारे काम होईल, आमच्या कलाकार मंडळींसाठी पर्यायी जागा कोणती असणार, तिथे प्रेक्षक येईल का असे अनेक प्रश्न आमच्या समोर आहेत, असेही भोसले म्हणाले
-
हे सर्व प्रश्न लक्षात घेता ही वास्तू पाडू नये, अन्यथा आम्ही अधिक तीव्र आंदोलन करू, असा इशारा मेघराज राजे भोसले यांनी यावेळी दिला.
-
कलावंतांनी यावेळी लावणी सादर करत आंदोलन केले (फोटो सौजन्य – सागर कासार)

Suryakumar Yadav: सूर्याचा घालीन लोटांगण शॉट! मिस्टर ३६० चा फटका पाहून वैभवने दिली भन्नाट रिॲक्शन, पाहा video