-
मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजित सभेत भाजपावर सडकून टीका केली.
-
या सभेत उद्धव ठाकरे यांनी ढेकणं चिरडण्यापासून धर्माची अफुची गोळी इथपर्यंत अनेक मुद्द्यांवर भाजपावर हल्ला चढवला. उद्धव ठाकरे यांच्या या सभेतील भाषणाच्या १० प्रमुख मुद्द्यंचा आढावा.
-
१. शस्त्रक्रिया झाल्यानंतर ६ महिन्यांनी मुंबईबाहेर पाऊल टाकलं. हे पहिलं पाऊल मराठवाड्यात टाकलं. आजच्याच दिवशी शिवसेनेने मराठवाड्यात पहिलं पाऊल टाकलं होतं. एवढ्या वर्षांनंतर शिवसेनेची ताकद वाढली आहे. मैदानात बसायला जागा नाही. तुमच्या रुपाने तुळजाभवानीचं रुप पाहतो आहे : उद्धव ठाकरे
-
२. ढेकणं चिरडायला तोफेची गरज नसते. त्यामुळे मला या सैनिकांची शक्तीही तिकडे वाया घालवायची नाही : उद्धव ठाकरे
-
३. मी पहिल्यांदा औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर बोलणार आहे. मी पाणी प्रश्न असताना त्याकडे तोंड फिरवणार नाही. मी असा मूर्ख राजकारणी आहे जो या पाणी प्रश्नाला भिडतो आहे. कारण माझ्याकडे प्रामाणिकपणा आहे. किती वर्ष ऐकत बसणार? आता निधी मंजूर केलाय, वेळेत पाणी योजना पूर्ण झाली नाही, तर ठेकेदारांना दयामाया न करता तुरुंगात टाकणार आहे : उद्धव ठाकरे
-
४. निवडणुका जिंकायच्या म्हणून घाईत औरंगाबाद मेट्रो आणि इतर विकास कामांची घोषणा करणार नाही. व्यवस्थित नियोजन करून आराखडा तयार करणार आणि मगच विकास करणार आहे. विकासाच्या नावावर शहर उद्ध्वस्त करणार नाही : उद्धव ठाकरे
-
५. मी आत्ताही शहराचं नाव बदलू शकतो, मात्र, नाव बदललं आणि पाणी प्रश्न तसाच राहिला, इतर प्रश्न तसेच राहिले तर संभाजी महाराज मला टकमक टोकावर नेतील : उद्धव ठाकरे
-
६. हिंदुत्व भगव्या टोपीत असेल, तर संघ काळी टोपी का घालतं? भाजपा जर ऐकत नसेल तर संघाने त्यांच्या कानाखाली मारली पाहिजे. म्हणून मी संघावर टीका केली : उद्धव ठाकरे
-
७. जो देशासाठी मरायला तयार असतो तो कोणत्याही धर्माचा असला तरी तो आमचा आहे. हे आमचं हिंदुत्व आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला मुसलमानांचा द्वेष करायला शिकवलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुराण सापडल्यावर त्याचा आदर केला. देशाची रक्षा करता करता औरंगजेब नावाचा जवानाने बलिदान दिलं. त्याला आम्ही परकं म्हणत नाही. तो आमचा आहे : उद्धव ठाकरे
-
८. संभाजीनगरच्या विषयी एकदा गोपीनाथ मुंडे घरी आले होते. तेव्हा ते यावेळी महापौर आम्हाला द्या, अशी मागणी केली. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी एका क्षणात होकार दिला. ते कागदावर आकडेमोड करत बसले नाही : उद्धव ठाकरे
-
९. अच्छे दिन आले का? कधी येणार? काहीच नाही, ते झटकून टाकतात. निवडणुका आल्यानंतर नको त्या खपल्या काढल्या जातात. पुन्हा एकदा धर्माची अफूची गोळी द्यायची आणि धर्माच्या नावावर मतं मिळवून सत्तेवर यायचं, मतदार मेला तरी चालेल. निवडणुका आली की पुन्हा कोणती तरी मशीद पाडू म्हणजे सगळे पुन्हा त्यांच्या मागे, अशी भाजपाची थेरं आहेत : उद्धव ठाकरे
-
१०. ईडी, सीबीआय लावा, पण काश्मीरमध्येही धाडी टाका. काश्मीरमध्ये पंडित भयभीत होऊन घरं सोडत आहेत, पण भाजपात एकही ‘माय का लाल’ नाही जो यावर बोलेल. इथं येऊन बांग्लादेशी येऊन राहत असतील, तर माझ्याच देशातील काश्मिरी पंडीतांना का राहता येत नाही : उद्धव ठाकरे
रात्री झोपण्याआधी गूळ आणि तूप नक्की खा; सकाळी परिणाम पाहून थक्क व्हाल, डॉक्टरांनी स्वत: दिली माहिती