-    ठाण्यातील ६४ शिवसेना नगरसेवकांनी काल(बुधवार) रात्री उशिरा ‘नंदनवन’ या शिंदे यांच्या मुंबईतील बंगल्यावर त्यांची भेट घेतली. 
-    ठाणे महापालिकेत शिवसेनेचे सद्य स्थितीत ६७ नगरसेवक आहेत. त्यात खासदार राजन विचारे यांच्या पत्नी नगरसेविका नंदिनी विचारे अनुपस्थितीत होत्या. 
-    टेंभी नक्याच शिवसेना नगरसेवक सुधीर कोकाटे हे अमरनाथ यात्रेसाठी गेल्याने ते नव्हते. 
-    तर घोडबंदर येथील पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक नरेश मणेरा यांची बायपास शस्त्रक्रिया झाल्याने तेही यावेळी उपस्थित नव्हते. 
-    उर्वरित ६४ नगरसेवक यावेळी हजर होते. 
-    नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत यावेळी या नगरसेवकांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार केला. 
-    नंदिनी विचारे यांचा अपवाद वगळता उर्वरित ६६ नगरसेवक शिंदे यांच्या सोबत आहेत अशी माहिती नरेश म्हस्के यांनी दिली. 
 
  Diwali 2026 Date : २०२६ मध्ये तब्बल सात दिवस साजरा केला जाणार दिवाळसण, ‘या’ दिवशी असेल लक्ष्मीपूजन, भाऊबीज 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  