-    पुणे शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येवरून आज मनेसच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले.(सर्व फोटो – सागर कासार) 
-    पुणे शहरात मागील काही दिवसापासून सतत पाऊस पडत आहे. 
-    यामुळे शहरातील रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. 
-    परिणामी वाहन चालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. 
-    या पार्श्वभूमीवर आज शहरातील विविध ठिकाणी मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. 
-    कोथरूड विभागाच्या वतीने आज खड्यांच्या भोवती रांगोळी काढून पुणे महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला. 
-    मनसे पदाधिकाऱ्यांनी खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यात मनपा असं लिहिलेल्या कागदी होड्या सोडून निषेध नोंदवला. 
-    लवकरात लवकर जर खड्डे बुजवले नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देखील मनसे कोथरूड विभाग अध्यक्ष सुधीर धावडे यांनी दिला आहे. 
-    आंदोलनात विभाग सचिव राजेंद्र वेडे पाटील, शहर संघटक शैलेश जोशी, उपविभाग अध्यक्ष रमेश उभे आदी उपस्थित होते. 
-    तसेच, सचिन विप्र, गणेश शिंदे, पांडुरंग सुतार, शाखा अध्यक्ष विराज डाकवे,किरण उभे, शुभम गुजर, किरण जोशी, ज्ञानेश्वर काकडे यावेळी उपस्थित होते. 
-    खड्ड्यांभोवती रांगोळी काढून आणि खड्ड्यांमध्ये कागदी होड्या सोडून आंदोलन करण्यात आले. 
-    यावेळी महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शहाराध्यक्ष साईनाथ बाबर यांची उपस्थिती होती. 
-    महापालिका प्रशासनाने तातडीने रस्ते दुरुस्त केले नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. 
-    खड्ड्यांमुळे शहरातील रस्त्यांची अक्षरशा चाळण झाली आहे. 
-    काही ठिकाणी तर प्रचंड मोठे खड्डे आहेत. जे वाहनधारकांसाठी धोकादायक आहेत. 
-    मनसेच्या आंदोलनात महिला पदाधिकाऱ्यांचा देखील समावेश होता 
-    मनसेच्या या अनोख्या आंदोलनाने पुणेकरांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसून आले. 
 
  प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी 
   
  
  
  
  
  
  
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  