-    शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या मुंबईतील काळाचौकीतील अभ्युदय नगर येथील शिवसेना शाखेचे उद्घाटन २४ जुलैला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. 
-    यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, शिवसेना खासदार अरविंद सावंत, सुभाष देसाई, सचिन अहिर, किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेक शिवसेना नेते उपस्थित होते. 
-    यावेळी शिवसेनेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. याप्रसंगी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांशी संवाद साधून अवाहन केले. 
-    “गेले बरेच दिवस अरविंद सावंत मला कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी बोलवत होते; पण मी दुर्लक्ष करत होतो. पण आता दुर्लक्ष करून चालणार नाही. आमदार-खासदार म्हणतात ते ऐकावे लागते असे हल्ली दिवस आहेत”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला. 
-    पुढे ते म्हणाले, “शिवसैनिक सामान्य असला तरी त्याची ताकद असामान्य आहे. शिवसेनेने ज्यांना शेंदूर लावून मोठे केले ते आज शिवसेना गिळायला निघाले आहेत. त्यांना भाजपाची साथ आहे.” 
-    “मुंबई व महाराष्ट्रावर वर्चस्व गाजवण्यासाठी मराठी माणूस व शिवसेनेला संपवण्याचा हा डाव असून ठाकरे-शिवसेना व मराठी माणूस हे नाते त्यांना संपवायचे आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 
-    न्यायालयीन लढाईसाठी गटप्रमुखापासून ते सर्व पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे मला हवी आहेत. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी ती शपथपत्रे आणि नवीन सदस्य नोंदणीचे अर्ज हीच भेट द्या, असे आवाहनही त्यांनी केले. 
-    त्याचबरोबर पुढच्या महिन्यापासून महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. 
-    तसेच शिवसेनेवर नियंत्रण मिळवण्यासाठी खासगी संस्था नेमून पैसा खर्च करून अर्ज भरून घेतले जात आहेत. आता सत्ता, पैसा आणि निष्ठा यांची लढाई आपल्याला लढायची आहे, असेही ठाकरे म्हणाले. 
-    शिवसेना शाखेच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी हजारो शिवसैनिकांनी उपस्थिती दर्शविली. 
-    (सर्व फोटो : शिवसेना/ ट्विटर) 
 
  देव असतो का? तुम्हालाही प्रश्न पडलाय? मग लिफ्टमध्ये अडकलेल्या या चिमुकल्यानं काय केलं पाहा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही 
   
  
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  