-
मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले होते. यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यपालांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
-
यावेळी बोलताना त्यांनी राज्यपालांचं हे पार्सल परत पाठवायला हवं, अशी प्रतिक्रिया दिली.
-
राज्यापालांच्या भाषणाची स्क्रिप्ट दिल्लीतून येते मुंबईतून याचा शोध घेतला पाहिजे, असा खोचक टोलाही त्यांनी भाजपाला लगावला.
-
घटनेची शपथ मोडणाऱ्या राज्यपाल कोश्यारी यांना घरी पाठवायचं की तुरुंगात याचा विचार करायला हवा, असं ही ते म्हणाले.
-
यासोबतच राज्यपालपदी आणलेलं हे पार्सल हलवायलाच हवं, असा मागणीही त्यांनी केली.
-
राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्राची माफी मागितलीच पाहिजे, असंही ते म्हणाले.
-
राज्यपाल पदाचा मान असतो. पण हा मान त्या व्यक्तीनं राखायला हवा. तो कोश्यारींनी ठेवलेला नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर केला.
-
महाराष्ट्राच्याच नशीबी अशी लोक का येतात हा प्रश्नच आहे, असे म्हणत त्यांनी राज्यपालांवर सडकून टीका केली.
-
रावणाचा जीव सजा बेंबीत होता, तसा दिल्लीचा जीव मुंबईत आहे, हे यावरून पुन्हा दिसतंय, असंही ते म्हणाले.
-
यापूर्वीही सावित्रीबाई फुल्यांबद्दलही यांनी असेच हिणकस उद्गार यांनी काढले होते.
-
तीन वर्ष महाराष्ट्राचं मीठ खाल्ल्यानंतर कोश्यारी यांनी नमकहरामी केली आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
-
राज्यपालांना जगप्रसिद्ध अशा कोल्हापूरचा जोडा दाखवण्याची गरज आहे.
-
राज्यपालांच्या स्पष्टीकरणानं समाधान झालेलं नाही. हे अनवधानानं आलेलं विधान नाही.
-
समाजामध्ये फूट पाडण्याचं काम राज्यपाल करत आहेत. मुंबईच्या पैशांवर त्यांचा डोळा असून राज्यपालांचा बोलवता धनी कोण आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
-

प्रसिद्ध अभिनेत्याने घटस्फोटानंतर ९ वर्षांनी केला साखरपुडा; अमृता खानविलकर कमेंट करत म्हणाली…