-
सक्तवसुली संचालनालयाने (ED) रविवारी (३१ जुलै) सकाळी सात वाजता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी दाखल होत चौकशी सुरू केली. त्यानंतर सायंकाळपर्यंत नेमकं काय झालं याचा आढावा.
-
ईडीने सकाळी संजय राऊत यांची चौकशी करत काही कागदपत्रांची मागणी केली. त्यानंतर राऊतांच्या पत्नीचीही चौकशी करण्यात आली आणि त्यांच्या घराची झडतीही घेण्यात आली.
-
राऊतांवरील कारवाईची माहिती मिळताच त्यांच्या मैत्री या बंगल्याबाहेर शिवसैना समर्थकांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे राऊतांनीही खिडकीतून हात उंचावत त्यांना अभिवादन केलं. (फोटो सौजन्य – नरेंद्र वासकर, एक्स्प्रेस फोटो)
-
ईडी राऊतांवर कारवाई करत असताना त्यांच्या घराबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (फोटो सौजन्य – दीपक जोशी, एक्स्प्रेस फोटो)
-
शिवसैनिकांकडून कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची पोलीस विभागाकडून पूर्ण काळजी घेतली जात होती. (फोटो सौजन्य – दीपक जोशी, एक्स्प्रेस फोटो)
-
राऊतांवरील या कारवाईचं वार्तांकन करण्यासाठी यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनीही मोठी गर्दी केली होती. (फोटो सौजन्य – दीपक जोशी, एक्स्प्रेस फोटो)
-
शिवसेनेचे कार्यकर्ते हातात भगवे झेंडे घेत राऊतांच्या घराबाहेर जमायला लागले होते. (फोटो सौजन्य – दीपक जोशी, एक्स्प्रेस फोटो)
-
काही शिवसैनिकांनी तर घराबाहेरच बैठक मारत ठिय्या आंदोलन केलं. यावेळी राऊतांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. (फोटो सौजन्य – दीपक जोशी, एक्स्प्रेस फोटो)
-
शिवसैनिकांकडून यावेळी राऊतांच्या भेटीचाही आग्रह धरण्यात आला. (फोटो सौजन्य – नरेंद्र वासकर, एक्स्प्रेस फोटो)
-
ईडीची कारवाई राजकीय सुडापोटी असल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी ईडीविरोधातही घोषणाबाजी केली. (फोटो सौजन्य – नरेंद्र वासकर, एक्स्प्रेस फोटो)
-
त्यामुळे कार्यकर्त्यांना रोखताना पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली. (फोटो सौजन्य – दीपक जोशी, एक्स्प्रेस फोटो)
-
दुपारनंतर संजय राऊत यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त आणखी वाढवण्यात आला. (फोटो सौजन्य – दीपक जोशी, एक्स्प्रेस फोटो)
-
पोलिसांनी शिवसैनिक जमा होणार नाही यासाठी प्रयत्न सुरू केले. (फोटो सौजन्य – दीपक जोशी, एक्स्प्रेस फोटो)
-
मात्र, त्यानंतरही शिवसैनिक मोठ्या संख्येने राऊतांच्या घराबेहर जमा झाले होते. (फोटो सौजन्य – नरेंद्र वासकर, एक्स्प्रेस फोटो)
-
जमा झालेले सर्व कार्यकर्ते राऊत निर्दोष असल्याचा दावा करत भाजपावर आरोपांच्या फैरी झाडत होते. (फोटो सौजन्य – नरेंद्र वासकर, एक्स्प्रेस फोटो)
-
अखेर सांयकाळी पाच वाजल्याच्या सुमारास संजय राऊत यांचे भाऊ सुनिल राऊत यांनी घराबाहेर येऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली. (फोटो सौजन्य – दीपक जोशी, एक्स्प्रेस फोटो)
-
यानंतर स्वतः संजय राऊत देखील घराबाहेर आले. यावेळी त्यांनी भगवी मफलर हाताने उंचावत कार्यकर्त्यांना अभिवादन केलं. (फोटो सौजन्य – नरेंद्र वासकर, एक्स्प्रेस फोटो)
-
यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे बंधु सुनिल राऊत व वरिष्ठ पोलीस अधिकारीही उपस्थित होते. (फोटो सौजन्य – नरेंद्र वासकर, एक्स्प्रेस फोटो)
-
राऊतांनी कार्यकर्त्यांना अभिवादन केल्यावर ईडीने त्यांना ताब्यात घेतलं आणि मागच्या गेटने ईडी कार्यालयाकडे नेले. (फोटो सौजन्य – दीपक जोशी, एक्स्प्रेस फोटो)
-
त्यानंतरही शिवसैनिक राऊतांच्या गाडीसमोर मोठ्या संख्येने जमा झाले. (फोटो सौजन्य – दीपक जोशी, एक्स्प्रेस फोटो)
-
ईडी राऊतांना ताब्यात घेऊन जाताना त्यांची आई, पत्नी व इतर कुटुंबीय भावूक झालेले दिसले. (फोटो सौजन्य – नरेंद्र वासकर, एक्स्प्रेस फोटो)
-
अशास्थितीतही राऊतांच्या आई, पत्नीने त्यांना हात उंचावत निरोप दिला. (फोटो सौजन्य – नरेंद्र वासकर, एक्स्प्रेस फोटो)
-
संजय राऊत ईडी कार्यालयाकडे जाताना शिवसैनिकांच्या गर्दीतून वाट काढणं पोलिसांना अवघड झालं होतं.
-
महिला शिवसैनिकांनी रस्त्यावरच ठाण मांडलेलं पाहायला मिळालं. (फोटो सौजन्य – दीपक जोशी, एक्स्प्रेस फोटो)
-
यावेळी महिला पोलीस अधिकाऱ्यांनी महिला शिवसैनिकांना समजाऊन सांगण्याचा प्रयत्न केला. (फोटो सौजन्य – दीपक जोशी, एक्स्प्रेस फोटो)
-
मात्र, शिवसैनिकांमधील विरोध काय राहिला आणि त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. (फोटो सौजन्य – दीपक जोशी, एक्स्प्रेस फोटो)
-
पुण्यातही या कारवाईचे पडसाद उमटले. (फोटो सौजन्य – पवन खेंगरे, एक्स्प्रेस फोटो)
-
पुण्यातही शिवसैनिकांनी या कारवाईचा जाहीर निषेध केला. (फोटो सौजन्य – पवन खेंगरे, एक्स्प्रेस फोटो)

‘एक नंबर तुझी कंबर…’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरीही करतायत कौतुक