-
बंडखोरी झाल्यानंतर शिवसेनेला बळकट करण्यासाठी युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे ठिकठिकाणी जाऊन शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून शिवसैनिकांना संबोधित करत आहेत.
-
बुधवारी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचे पहिल्या दिवसाचे कामकाज आटोपल्यानंतर आदित्य ठाकरेंनी रायगडमधील अलिबाग येथे जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधला.
-
मुसळधार पाऊस कोसळत असतानाही त्यांच्या शिवसंवाद यात्रेला हजारो शिवसैनिकांनी उपस्थिती दर्शविली.
-
आदित्य ठाकरेंच्या अलिबागमधील शिवसंवाद यात्रेचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
अलिबागमध्ये केलेल्या भाषणात त्यांनी राज्यातील शिंदे सरकारवर निशाणा साधला.
-
“राज्यात सुरू असलेलं घाणेरडं राजकारण तुम्हाला चालणार आहे का? या गद्दारांना तुम्ही आपले नेते मानणार आहात का?”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित शिवसैनिकांना विचारला.
-
“राज्याचे तात्पुरतं मुख्यमंत्री यांना शपथ घेतल्यानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यासाठी ४१ दिवस लागले. त्यानंतर पाच दिवसांनी खातेवाटप जाहीर केले”, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर टीका केली.
-
रायगडमधील शिवसेनेचे शिंदे गटात सामील झालेले आमदार भरत गोगावले यांनाही त्यांनी टोला लगावला.
-
“नवीन मंत्रिमंडळात आणि या गद्दारांच्या सरकारमध्ये रायगडला काय मिळालं?”, असा प्रश्न उपस्थित करत आदित्य ठाकरेंनी गोगावलेंवर टीका केली.
-
पुढे ते म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारच्या काळात रायगड किल्ल्यासाठी ६०० कोटींचा निधीमधले २०कोटी दिले. तसेच जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी निधी दिला”.
-
“रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक निर्णय घेतले गेले. पण, राज्यातील तात्पुरत्या सरकारने या जिल्ह्यासाठी कोणते निर्णय घेतले?”, असा प्रश्नही त्यांनी भाषणातून उपस्थित केला.
-
सध्या आदित्य यांच्या शिवसंवाद यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यातील शेवटचा दौरा सुरु आहे.
-
या यात्रेचा चौथा टप्पा २० ऑगस्टपासून सुरु होणार असून यादरम्यान ते जळगाव इथल्या पाचोरा, धरणगाव, पारोळा, धुळे आणि मालेगाव येथील कार्यकर्त्यांशी साधणार आहेत .
-
(सर्व फोटो : आदेश बांदेकर, आदित्य ठाकरे/ सोशल मीडिया)

Suryakumar Yadav: सूर्याचा घालीन लोटांगण शॉट! मिस्टर ३६० चा फटका पाहून वैभवने दिली भन्नाट रिॲक्शन, पाहा video