-
गुजरात न्यायालयाने बिल्किस बानो प्रकरणातील ११ दोषींची सुटका केली आहे.
-
दोषींच्या सुटकेनंतर देशभरात मोठ्या प्रमाणात आंदोलने करण्यात येत आहेत. कोलकात्यात नागरिकांनी रस्त्यांवर उतरत केंद्र सरकारविरोधात निर्देशने केली.
-
जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी गुजरात सरकारने बिल्किस बानोच्या खटल्यातील दोषींना सुनावलेली शिक्षा माफ केल्याच्या विरोधात नवी दिल्लीत निदर्शने केली. (पीटीआय)
-
मुंबईतील दादर येथे बिल्किस बानोच्या समर्थनार्थ नागरिक रस्त्यांवर फलक घेऊन उभे होते.
-
गुजरात सरकारने बिल्किस बानोच्या खटल्यातील दोषींना सुनावलेली शिक्षा माफ केल्याच्या विरोधात कार्यकर्ते आणि विविध महिला संघटनांच्या सदस्यांनी बंगळुरू येथील स्वातंत्र्य उद्यानात आंदोलन केले. (पीटीआय)
-
उद्यानात नागरिक, कार्यकर्ते आणि विविध महिला संघटनांच्या सदस्या भर पावसात हातात पोस्टर घेऊन उभ्या होत्या.
-
या आंदोलनात महिला बिल्किस बानोच्या समर्थनार्थ सहभागी झाल्या होत्या
-
मुस्लीम परिषदेचे अध्यक्ष इब्राहिम ताई यांनी मुंबईतील मिनारा मशिदीबाहेर बिल्किस बानो प्रकरणात न्याय मिळावा या मागणीसाठी उपोषण केले. (पीटीआय)
-
गुजरातच्या गोध्रा दंगलीतील बिल्किस बानो प्रकरणात ११ दोषींच्या सुटकेविरोधात अहमदाबादमध्ये सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
-
अहमदाबादमधील आश्रम रोड येथे बिल्किस बानोला न्याय मिळावा या मागणीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘मला माफ करा, बिल्किस बानो’ अशा आशयाचे पोस्टर हाती घेत आंदोलकांनी बिल्किस बानोंची माफी मागितली. (फोटो- निर्मल हरिंद्रन, एक्सप्रेस )
-
अहमदाबाद येथील आश्रम रोड येथे बिल्किस बानोला न्याय मिळावा या मागणीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. (फोटो- निर्मल हरिंद्रन, एक्सप्रेस )
-
गुजरात सरकारने बिल्किस बानो प्रकरणातील ११ दोषींच्या सुटकेच्या विरोधात स्त्री-मुक्ती आंदोलन समितीच्यावतीने पुण्यातील गुडलक चौकात निदर्शने करण्यात आली. (एक्स्प्रेस फोटो पवन खेंगरे)

“एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…