-
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे (सपा) संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे आज पहाटे उपचारादरम्यान निधन झाले.
-
मुलायम सिंह यादव तीन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते.
-
१९७० च्या दशकात जेव्हा देशात ओबीसी चळवळ जोर धरत होती, त्याकाळात मुलायम सिंह यादव यांनी समाजवादी नेता म्हणून राजकारणात प्रवेश केला.
-
मुलायम सिंह यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९३९ रोजी ईटावा येथे झाला. कुस्तीपटू असलेल्या मुलायम सिंह यांनी राज्यशास्रात पदव्यूत्तर पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले होते.
-
राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी शिक्षक म्हणून नोकरीही केली होती.
-
१९८९ मध्ये त्यांनी उत्तर प्रदेशचे १५वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
-
१९८९ मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी मुलायम सिंह यांनी व्हीपी सिंग यांच्या नेतृत्वाखालील जनता दलात प्रवेश केला.
-
त्यावेळी त्यांच्याकडे यूपीचे प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली होती.
-
मुख्यमंत्री झाल्यानंतर मुलायम सिंह यांनी हरिवंशराय बच्चन यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला होता. यावेळी अभिनेते अमिताभ बच्चन उपस्थित होते.
-
१९९२ मध्ये मुलायम सिंह यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. आज समाजवादी पक्ष उत्तर प्रदेशच्या राजकारणात एक महत्त्वाचा पक्ष आहे. राममनोहर लोहिया यांच्या पुण्यतिथीला आयोजित कार्यक्रमात भाऊ शिवपाल सिंह यादव यांच्यासह उपस्थित होते.
-
१९९३ मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपत घेतली होती. यावेळी समाजवादी पक्षाने १०८ जागा जिंकल्या होत्या.
-
१९९६ मध्ये ते पहिल्यांदाच लोकसभेत निवडून गेले.
-
एचडी देवेगौडा आणि आय.के. गुजराल यांच्या सरकारमध्ये संरक्षणमंत्री म्हणूनही काम पाहिले होते.
-
२०१२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने विजय मिळवत, राज्यात सरकार स्थापन केले.
-
त्यांनी अखिलेश यादव यांना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली.

India On Trump : “राष्ट्रीय हितांचं रक्षण करण्यासाठी सर्व…”, अमेरिकेने २५ टक्के टॅरिफ लादल्यानंतर भारताचं सडेतोड उत्तर