-
उत्तर प्रदेशमध्ये त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच देव दिवाळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
-
यावेळी गंगा नदीवरील वेगवेगळ्या घाटांवर दिवे लावण्यात आले होते. दिव्यांसोबतच अनेक ठिकाणी नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली होती.
-
या रोषणाईमुळे गंगा नदीवरील अनेक घाट उजळून निघाले होते. देव दिवाळी साजरी करण्यामागे पौराणिक कथा आहे.
-
त्रिपुरासुर राक्षसाचे अत्याचार आणि अधर्मामुळे पृथ्वी, स्वर्ग आणि नरक अशा तिन्ही लोकांमध्ये हाहाकार माजला होता.
-
यासाठी सर्व देवतांनी भगवान शंकराकडे प्रार्थना केली. त्यानंतर भगवान शंकराने कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरासुराचा वध केला.
-
उत्तर प्रदेशमधील वाराणसी घाटावर देव दिवाळी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
-
वारणसीमधील येथील गंगा घाटावर दिव्यांसह आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.
-
उत्तर प्रदेशमधील मथुरेतही देव दिवाळीनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दीप प्रज्वलनामुळे येथील परिसर उजळून निघाला होता.
-
मथुरा घाटावरदेखील अशाच प्रकारे दिवे लावण्यात आले होते.

PBKS vs MI: मुंबईची नंबर १ बनण्याची संधी हुकली! हार्दिकने पराभवाचं खापर कोणाच्या डोक्यावर फोडलं? सामन्यानंतर म्हणाला..