-    बुधवारपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. विविध पक्षाचे खासदार या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संसदेत दाखल झाले. शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहात जाताना पत्रकारांना प्रतिसाद दिला. 
-    अधिवेशनासाठी टीएमसीचे खासदार डेरेक ओब्रायन सभागृहात जाताना पत्रकारांनी त्यांचे छायाचित्र टीपले. 
-    संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुलाही पोहोचले होते. टीएमसीच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी त्यांना पायऱ्या चढताना मदत केली. यावेळी खासदार सुप्रिया सुळेदेखील उपस्थित होत्या. 
-    भाजपा खासदार बिप्लब देब आणि काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधला. 
-    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही सभागृहात जाण्यापूर्वी भाजपाचे उन्नावचे खासदार साक्षी महाराज यांची भेट घेतली. 
-    भाजपाचे खासदार रवी शंकर प्रसाद आणि एलजेपी खासदार चिगार पासवान यांनीही सभागृहात जाण्यापूर्वी पत्राकारांशी संवाद साधला. दरम्यान शुक्रवारी चिराग पासवान यांनी बिहारमध्ये वाढती गुन्हेगारी आणि इतर मुद्यांवरून बिहार सरकारवर जोरदार टीका केली. 
-    भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनीही ‘विक्ट्री साईन’ देत उपस्थित पत्रकारांना प्रतिसाद दिला. 
-    पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानदेखील सभागृहात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रलंबित विधेयकांबाबत चर्चा केली. 
-    यावेळी महिला खासदारांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. 
 
  अगं बाई! साडीतील काकूंचा ठुमका पाहून थक्क झाले नेटकरी; VIDEO पाहून म्हणाले “आंटी तर लहानपणी….. 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  