-  
  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख तब्बल १ वर्ष, १ महिना आणि २७ दिवसांनी अखेर तुरुंगाबाहेर आले आहेत. (छायाचित्र सौजन्य – गणेश शिरसेकर, एक्स्प्रेस फोटो)
 -  
  ईडी आणि सीबीआय अशा दोन्ही प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका झाली आहे. (छायाचित्र सौजन्य – गणेश शिरसेकर, एक्स्प्रेस फोटो)
 -  
  अनिल देशमुख तुरुंगाबाहेर आले तेव्हा जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. (छायाचित्र सौजन्य – गणेश शिरसेकर, एक्स्प्रेस फोटो)
 -  
  मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अनिल देशमुखांनी बुधवारी (२८ डिसेंबर) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, सचिन वाझे ते उद्योगपती मुकेश अंबानींच्या घरासमोरील स्फोटकं अशा विविध विषयांवर भाष्य केलं. त्याचा हा आढावा…
 -  
  मला खोट्या आरोपात फसवण्यात आले आहे. परमवीर सिंह यांनी माझ्या १०० कोटी रुपयांचा खोटा आरोप लावला – अनिल देशमुख
 -  
  मात्र, त्याच परमबीरने न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या कोर्टात जाऊन प्रतिज्ञापत्र दिलं की, मी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींचे जे आरोप केले ते फक्त ऐकीव माहितीवर आधारित आहेत. माझ्याकडे त्याबाबत काहीही पुरावा नाही – अनिल देशमुख
 -  
  उच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये न्यायालयाने निरिक्षण नोंदवलं आहे. सचिन वझे परमबीर सिंह यांचे निकटवर्ती होते. वझेंवर अतिशय गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत. असा व्यक्तीच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही – अनिल देशमुख
 -  
  दोन खूनाच्या गुन्ह्यांमध्ये त्याला अटक झाली आहे. सचिन वझेचं तीनवेळा निलंबन झालं आहे. एकदा त्याला १६ वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं – अनिल देशमुख
 -  
  मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याच्या प्रकरणातही सचिन वझेला अटक झाली आहे – अनिल देशमुख
 -  
  तीनवेळा सचिन वाझेला निलंबित करण्यात आलं आहे. अशा व्यक्तीच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही, असं निरिक्षण उच्च न्यायालयाने नोंदवलं – अनिल देशमुख
 -  
  माझ्यावर झालेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचंही न्यायालयाने म्हटलं – अनिल देशमुख
 -  
  सचिन वाझेनेही न्यायमूर्ती चांदीवाल यांच्यासमोर शपथेवर जबाब दिला की, त्याने केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही – अनिल देशमुख
 -  
  सचिन वाझेने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे जबाब दिले आहेत. त्यामुळे सचिन वाझेच्या साक्षीमध्ये आणि आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही – अनिल देशमुख
 -  
  मला अतिशय दुःख आहे की, एका खोट्या गुन्ह्यात आणि तेही एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीने केलेल्या आरोपांवरून मला १४ महिने तुरुंगात राहावं लागलं – अनिल देशमुख
 -  
  न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. न्यायालयाने मला न्याय दिला त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो – अनिल देशमुख
 -  
  राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते शरद पवार आणि सर्व वरिष्ठ सहकारी यांनी वेळोवेळी जो पाठिंबा दिला, सहकार्य केलं त्याबद्दल त्या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानतो – अनिल देशमुख
 -  
  अनिल देशमुख तुरुंगाबाहेर आले तेव्हा त्यांचं स्वागत करण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ऑर्थर रोड तुरुंगाबाहेर मोठी गर्दी गेली होती.
 -  
  सीबीआय आणि ईडी अशा दोन्ही प्रकरणात अनिल देशमुखांना जामीन मिळाल्याने हा त्यांच्यासाठी मोठा दिलासा ठरला आहे. (छायाचित्र सौजन्य – संग्रहित)
 
  तब्बल ३० वर्षांनंतर कर्मदाता शनिचा विपरीत राजयोग; ‘या’ ३ राशीच्या लोकांचं नशिब पालटणार, कर्जमुक्ती सोबत पैसाही भरपूर येणार…