-
निवडणूक आयोगासमोर आज पुन्हा एकदा सुनावणी झाली. या सुनावणीत शिंदे गट विरूद्ध ठाकरे गट असा सामना रंगलेला पाहण्यास मिळाला.
-
ठाकरे गटाची बाजू कपिल सिब्बल यांनी मांडली, मागच्या वेळी शिंदे गटाने केलेले दावे त्यांनी खोडून काढले
-
महेश जेठमलानी यांनी शिंदे गटाची बाजू निवडणूक आयोगासमोर सादर केली
-
कपिल सिब्बल यांनी सुरूवातीलाच युक्तिवाद केला आणि मागच्या वेळी शिंदे गटाने केलेले दावे खोडले, एवढंच नाही तर शिवसेनाही उद्धव ठाकरेंचीच आहे. काही लोक पक्ष सोडून गेल्याने फरक पडत नाही असंही त्यांनी म्हटलं.
-
कपिल सिब्बल म्हणाले की पक्ष फुटल्याचा जो दावा केला जातो आहे तो काहीही अर्थ नसलेला आहे. काही लोक सोडून गेले म्हणजे पक्ष फुटला असं नाही तो जागेवर आहे.
-
एवढंच नाही तर शिंदे गटाने सादर केलेली कागदपत्रं खोटी आहेत असाही दावा कपिल सिब्बल यांनी केला.
-
त्यानंतर महेश जेठमलानी यांनी शिंदे गटासाठी युक्तिवाद केला. जेव्हा एवढे मोठे सदस्य बाहेर पडतात तेव्हा ते चुकीचं कसं काय ठरू शकतं? असा प्रश्न जेठमलानी यांनी विचारला.
-
एवढंच नाही तर एकनाथ शिंदे यांच्याकडे विधानसभेत आणि लोकसभेत बहुमत आहे त्यामुळे त्यांनाच पक्ष आणि चिन्ह मिळालं पाहिजे निर्णय लवकर घ्या अशी विनंती महेश जेठमलानी यांनी केली.
-
यानंतर कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा उभं राहात सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत निर्णय देऊ नये अशी विनंती केली. तर दुसरीकडे वेळही मागून घेतली. ज्यानंतर पुढील सुनावणी २० तारखेला होईल असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.
-
निवडणूक आयोगाने पुढची तारीख दिल्याने आता शिवसेना कुणाची धनुष्यबाण कुणाला मिळणार हा वाद आणखी याचा निर्णय लागण्यासाठी पुढची तारीख पडली आहे.

HSRP Number Plate News: ‘एचएसआरपी’ पाटीबाबत मोठी घडामोड… मुदतवाढ मिळाल्याने ‘या’ तारखेपर्यंत…