-
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चांनी राज्याच्या राजकारणाचा पारा चढला. यावर शरद पवारांपासून राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. याचा हा आढावा…
-
अजित पवार मंत्रालयात असून माझ्या बिचार्या दादाचे असे झाले आहे की काहीही झाले तरी माझ्या भावावर त्याचे खापर फोडले जाते – सुप्रिया सुळे
-
पण मार्केटमध्ये जे नाणे चालते. त्याचीच जास्त चर्चा सुरू असते – सुप्रिया सुळे
-
त्यामुळे मला एक गोष्ट आठवते. ती म्हणजे भूकंप झाला तर तो पवारसाहेबांनी केला. पण त्या भूकंपामध्ये बिचार्या पवारसाहेबांची काय चूक आहे – सुप्रिया सुळे
-
मी नेहमी सर्व आमदार आणि खासदार यांच्या संपर्कात असते. तसेच शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील हेही २४ तास सर्वांच्या संपर्कात असतात – सुप्रिया सुळे
-
त्यामुळे जर एखादा कोणी नाराज असता, तर ते आमच्या कानावर निश्चित आले असते. त्यामुळे एकूणच आमच्या कोणाच्याही मनात शंका नसून टीव्हीवर ती जास्त वाटत आहे – सुप्रिया सुळे
-
अजित पवारांनी वज्रमूठ सभेत भाषण केलं नाही, याचा खुलासा त्यांनी स्वत:च केला आहे – अनिल देशमुख
-
विधानसभा अधिवेशनात अजित पवारांनी आपली भूमिका जोरदारपणे मांडली आहे. तसेच, राष्ट्रवादीत सर्वकाही अलबेल आहे – अनिल देशमुख
-
अजित पवारांबाबत ज्या चर्चा सुरू आहेत त्या मिथ्या आहेत – अमोल मिटकरी
-
स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतंच स्पष्ट केलं आहे की, ‘सध्या ही चर्चा तुमच्या मनात आहे, ती आमच्याा कुणाच्याही मनात नाही – अमोल मिटकरी
-
या चर्चेला अजिबात महत्त्व नाही. काहीतरी बातम्या तयार करण्याचं काम कुणीतरी करतंय – अमोल मिटकरी
-
भाजपाकडून या कंड्या पिकवल्या जातायत तर ते तपासलं पाहिजे. एका वर्तमान पत्राच्या बामीवर चर्चा घडवणं योग्य नाही – अमोल मिटकरी
-
अजित दादांना ठरवून टार्गेट केलं जातंय का याची शहानिशा व्हायला हवी. भाजपाचे लोक तोंडसूख घेत असतील तर त्यांना घेऊ दे – अमोल मिटकरी
-
रवी राणांसारख्या लोकांना बोलू देत. परंतु या चर्चेत तथ्य नाही. दादा उपमुख्यमंत्री होते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि गटनेते आहेत – अमोल मिटकरी
-
त्यामुळे दादा जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्यच असेल. पण दादा भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतील हे कोणी सांगितलं – अमोल मिटकरी
-
अजित पवार शरद पवारांच्या शब्दाबाहेर जातील असं तुम्हाला वाटतं का? त्यामुळे या सर्व चर्चा केवळ मिथ्या आहेत – अमोल मिटकरी
-
धनंजय मुंडे यांना माध्यमांनी विचारलं की राष्ट्रवादीत सगळं काही ओके आहे का? ‘ऑल इज वेल’ आहे का? त्यावर धनंजय मुंडेंनी आमच्या पक्षात ‘ऑल इज वेल’ आहे असं एका वाक्यात उत्तर दिलं.
-
सध्या ही चर्चा तुमच्या मनात आहे, ती आमच्याा कुणाच्याही मनात नाही – शरद पवार
-
या चर्चेला अजिबात महत्त्व नाही. काहीतरी बातम्या तयार करण्याचं काम कुणीतरी करतंय. त्याला काहीही अर्थ नाही – शरद पवार
-
मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरतं सांगू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षात काम करणारे आमचे सगळे सहकारी एका विचाराने पक्षाला शक्तीशाली कसं करायचं या भूमिकेत आहेत. त्याशिवाय दुसरा कुठलाही विचार कुणाच्या मनात नाही – शरद पवार
-
कारण नसताना माझ्याबद्दल आणि माझ्या काही सहकार्यांबद्दल गैरसमज निर्माण करण्याचं काम जाणीपूर्वक केलं जात आहे – अजित पवार
-
वास्तविक ज्या बातम्या दाखवल्या जात आहेत, यामध्ये काहीही तथ्य नाही – अजित पवार
-
आपल्या सर्वांना माहीत आहे, अलीकडेच नागपूरला महाविकास आघाडीची सभा होती, तिकडे आम्ही सगळे नेते गेलो होतो – अजित पवार
-
आपण सातत्याने माझ्याबद्दल ज्या काही बातम्या पसरवत आहात किंवा दाखवत आहात, त्यामध्ये काहीही तथ्य नाही – अजित पवार
-
मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांच्या सह्या घेण्याचं काहीही कारण नाही. आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहणार आहोत – अजित पवार
-
त्यामुळे संबंधित बातम्यांना कसलाही आधार नाही. काही प्रसारमाध्यमांवर वेगवेगळ्या पक्षाचे लोकदेखील त्यांचं मत व्यक्त करत आहेत. त्यांनी काय मत व्यक्त करावं, हा त्यांचा अधिकार आहे – अजित पवार
-
साधारण मंगळवारी किंवा बुधवारी आमदारांच्या कमिटीच्या बैठका असतात. अनेक आमदार मंत्र्यांकडे किंवा मंत्रालयात कामाच्या निमित्ताने येत असतात. त्यामुळे आजही जे आमदार येथे आले होते, ते मला भेटायला आले होते. ही नेहमीची पद्धत आहे. याचा वेगळा अर्थ काढू नका – अजित पवार
-
संबंधित आमदारांची वेगवेगळी कामं होती. ते आमदार त्यांची विविध कामं घेऊन मला भेटायला आले होते – अजित पवार
-
नागपूरला मी बोललो नाही त्याची बातमी झाली. पण बाळासाहेब थोरात बोलले नाहीत त्याची बातमी कुणीही केली नाही. नागपूरला आम्ही ठरवलं होतं की दोन दोन व्यक्ती बोलतील. त्यामुळे आम्ही तसा निर्णय घेतला – अजित पवार
-
मात्र जो बोलला नाही त्याची बातमी कशाला करता. एवढं तुमचं का प्रेम उतू चाललं आहे असंही अजित पवारांनी माध्यमांना विचारला आहे – अजित पवार
-
मी ट्वीटरवरून वॉलपेपर काढला त्याचीही बातमी तुम्ही लोक करता? ध चा मा करू नका ना! पक्षाच्या बाहेरचे लोक विघ्नसंतोषी आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊ नका – अजित पवार
-
काही पत्रकार तर मला सकाळीही विचारत होते की तुम्ही जाणार आहात का भाजपात? त्यांना म्हटलं आता काय तुम्हाला स्टँप पेपरवर लिहून देऊ का? की प्रतिज्ञापत्र करून देऊ? – अजित पवार
-
बाबांनो काही काळजी करू नका. शरद पवार यांच्या नेतृत्वात अनेक चढ-उतार आले आहेत – अजित पवार
-
ज्या काही बातम्या पसरवल्या जात आहेत त्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत – अजित पवार
-
महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे महाराष्ट्रातल्या जनतेचं दुर्लक्ष व्हावं हा हेतू आहे. आम्ही शरद पवारांच्या नेतृत्वात काम करतो आहे – अजित पवार
-
माझे सहकारी कुठेही गेलेले नाहीत आम्ही सगळे शरद पवारांच्यासोबत आहे – अजित पवार
-
तुम्हीही कुणालाही जाऊन विचारा कुणाचीही कुठेही सही घेतलेली नाही – अजित पवार
-
आम्हाला एखादी भूमिका घ्यायची असेल तर आम्ही उघडपणे घेऊ ना – अजित पवार
-
आमचे नेते शरद पवार आहेत. महाविकास आघाडी म्हणून आम्ही काम करतो आहोत. तुम्ही काहीतरी बातम्या तयार करता आणि मग उत्तरं आम्हाला विचारता – अजित पवार
-
राष्ट्रपती पक्षाची स्थापना स्वाभिमानातून झाली आहे. १० जूनला १९९९ पासून आम्ही काम करतोय. आजही आम्ही काम करतोय, उद्याही करत राहणार. जोपर्यंत आमच्या जिवात जीव आहे, तोपर्यंत आम्ही पक्षाचं काम करत राहणार – अजित पवार
-
या बातम्या विपर्यास करून दाखवल्या जातात. अशा चर्चा सुरू झाल्याने जवळचे कार्यकर्ते नाराज होतात. संभ्रामवस्थेत जातात. परंतु, यात काहीही तथ्य नाही – अजित पवार
-
प्रत्येकाने आपआपलं काम करा, महाविकास आघाडी बळकट होण्याकरता प्रयत्न करा – अजित पवार (सर्व छायाचित्र – संग्रहित)

शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘अशी चिक मोत्याची माळ’ गाण्यावर डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक