-
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. रशियाचा दौरा आटोपल्यानंतर लगेचच ते युरोपियन देश ऑस्ट्रियाला पोहोचले आणि तेथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. (पीटीआय)
-
भारतीय पंतप्रधान ऑस्ट्रिया दौऱ्यावर असणे हे मोदींच्या रुपात तब्बल ४१ वर्षांनंतर घडले आहे. यादरम्यान त्यांनी अमेरिका आणि पाकिस्तानबद्दल काय भाष्य केले ते जाणून घेऊयात. (पीटीआय)
-
खरे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाच्या दौऱ्यावर गेले होते, तेव्हा मॉस्कोने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारतासोबतच्या रशियाच्या संबंधांबद्दल चिंता व्यक्त केली होती. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, पंतप्रधान मोदी काय म्हणाले ते पाहण्यासाठी मी त्यांच्या सार्वजनिक वक्तव्याकडे लक्ष देईन. यासोबतच त्यांनी रशियासोबतच्या संबंधांबाबत भारताला आपल्या चिंता स्पष्ट केल्या आहेत. (पीटीआय)
-
खरे तर रशिया आणि भारताची मैत्री शतकानुशतके जुनी आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून रशियाच्या विरोधात जाण्यासाठी अमेरिका भारतावर सतत दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. पण भारताने आपली भूमिका कायम ठेवली आणि ती साऱ्या जगाने पाहिली. (पीटीआय)
-
आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रियातून केलेले विधान बहुधा अमेरिकेसाठी आहे. पीएम मोदी ऑस्ट्रियामध्ये म्हणाले की, “मी यापूर्वीही सांगितले आहे की ही युद्धाची वेळ नाही. युद्धभूमीवर समस्या सोडवता येत नाहीत. निष्पापांचे प्राण जाणे मान्य नाही”. (पीटीआय)
-
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादावरही भाष्य केले. साहजिकच नाव न घेता त्यांचा इशारा दहशतवादाचा धनी असलेल्या पाकिस्तानकडे होता. पीएम मोदी म्हणाले की, “आम्ही क्लाइमेट चेंज आणि दहशतवादावरही आमची मते मांडली आहेत. आम्ही दोघेही दहशतवादाच्या विरोधात असून त्याचा निषेध करतो.” (पीटीआय)
-
यासोबतच पीएम मोदी म्हणाले की, “आम्ही यूएनएससी आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांमधील बदलांना सहमती देतो. भारत आणि ऑस्ट्रिया शांतता आणि स्थिरतेची लवकरात लवकर पुनर्रचना करण्यासाठी संवाद आणि कौशल्यास प्राधान्य देऊन त्याचा आग्रह धरतो. यासाठी आम्ही सर्व सहकार्य करू”. (पीटीआय)
-
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र यांनी ऑस्ट्रियामध्ये भारतीयांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी वंदे मातरमची धून वाजवण्यात आली. यानंतर ते ऑस्ट्रियाचे चॅन्सलर कार्ल नेहमर यांना स्टेट डिनरसाठी भेटायला गेले. नेहमर यांनी मोदींसोबत सेल्फीही काढला. पीएम मोदींआधी ४१ वर्षांपूर्वी इंदिरा गांधी १९८३ मध्ये ऑस्ट्रिया दौऱ्यावर गेल्या होत्या. (पीटीआय)

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक