-
भाजपा खासदार बॉलीवूड क्वीन कंगना रणौत यांची खासदारकी धोक्यात आली आहे. त्यांच्या निवडीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून त्यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. (फोटो- Kangana Ranaut/Insta)
-
हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने बुधवारी कंगना रणौत यांच्या भाजपाच्या मंडी लोकसभा प्रतिनिधी म्हणून निवडीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर नोटीस बजावली आहे. कंगना यांना २१ ऑगस्टपर्यंत या नोटीसला उत्तर द्यावे लागणार आहे. (फोटो- Kangana Ranaut/Insta)
-
वन विभागाचे माजी कर्मचारी राम नेगी नावाच्या व्यक्तीने कंगना यांच्या विरोधात ही याचिका दाखल केली असून कंगना यांचा निवडणूक निकाल रद्द करण्याची मागणी केली आहे. राम नेगी यांनी असे का केले ते जाणून घेऊयात. (फोटो- Kangana Ranaut/Insta)
-
राम नेगी यांचे म्हणणे आहे की, त्यांचे हक्क हिरावून घेतले आहेत. त्यांना ही निवडणूक लढवायची होती पण मंडीच्या निवडणूक अधिकाऱ्याने त्यांचा उमेदवारी अर्ज जाणीवपूर्वक नाकारला. (फोटो- Kangana Ranaut/Insta)
-
याचिकाकर्ते राम नेगी यांचे म्हणणे आहे की, जर त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला नसता तर ते निवडणूक जिंकले असते. त्यामुळे आता कंगना यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करून मंडी मतदारसंघात पुन्हा निवडणुका घ्याव्यात, अशी त्यांची मागणी आहे. (फोटो- Kangana Ranaut/Insta)
-
नेगी यांच्या म्हणण्यानुसार, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्यांच्याकडून वीज, पाणी आणि टेलिफोनचे नो ड्यूज प्रमाणपत्र मागितले गेले आणि त्यासाठी त्यांना दुसऱ्या दिवसापर्यंत वेळ देण्यात आला. (फोटो- Kangana Ranaut/Insta)
-
परंतु जेव्हा ते कागदपत्रांसह पोहोचले तेव्हा त्यांनी ते स्वीकारण्यास नकार दिला आणि त्यांची उमेदवारी नाकारण्यात आली. (फोटो- Kangana Ranaut/Insta)
-
ही याचिका लक्षात घेऊन कंगना यांना नोटीस पाठवण्यात आली असून, कंगना यांना आता उत्तर द्यावे लागणार आहे. (फोटो- Kangana Ranaut/Insta)
-
यावर कंगना यांच्या बाजूने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. (फोटो-संग्रहित छायाचित्र)

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे या ‘रविवारी’ बँक सुरू ठेवण्याचे आदेश; मोठी घडामोड होणार…