-
विनेश फोगटला इतिहास रचण्याची सवय आहे. तिने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये ५३ किलो फ्रीस्टाइल महिला कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचून इतिहास रचला, जरी ती पदक जिंकण्यापासून हुकली. आता विनेश निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे, ती इथेही इतिहास रचू शकेल का?
-
भारताची माजी महिला कुस्तीपटू विनेश फोगट पहिल्यांदाच हरियाणा विधानसभा निवडणूक लढवणार आहे. विनेश फोगटला यावेळी काँग्रेसकडून तिकीट मिळाले असून कुस्तीच्या आखाड्यानंतर ती निवडणुकीच्या आखाड्यात नशीब आजमावताना दिसणार आहेत.
-
जुलाना विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने विनेश फोगटला उमेदवारी दिली आहे. विनेशचा सामना प्रामुख्याने भाजपाचे कॅप्टन योगेश बैरागी आणि आपच्या उमेदवार कविता दलाल यांच्याशी होणार आहे.
-
विनेश फोगट ज्या जागेवर निवडणूक लढवणार आहे, त्या जागेवर गेल्या काही वर्षांत काँग्रेसचा रेकॉर्ड खराब आहे. २००५ मध्ये जुलाना येथे काँग्रेसने शेवटचा विजय मिळवला होता. म्हणजे गेल्या १९ वर्षांपासून काँग्रेसला ही जागा जिंकता आलेली नाही.
-
विनेश फोगटला हा १९ वर्षांचा वाईट विक्रम मोडण्याची संधी असेल, कॉँग्रेसला विनेशच्या नावाचा फायदा होतो की नाही हे येणाऱ्या कळत स्पष्ट होईल.
-
विनेश फोगटने अलीकडेच तिच्या कुस्ती कारकिर्दीला निरोप दिला आणि त्यानंतर राजकारणात येण्याची घोषणा केली.
-
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक गमावल्यानंतर विनेशने आपल्या कुस्ती कारकिर्दीला अलविदा केला होता.
-
विनेशने कुस्ती सोडल्यानंतर काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि यावेळी तिला निवडणूक लढवण्यासाठी तिकीटही मिळाले. राजकारणातून खेळ आणि देशाला पुढे नेण्याचे काम करणार असल्याचे विनेशने स्पष्टपणे सांगितले आहे. (सर्व फोटो साभार- एपी)

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”