-
बिहारचे लोकप्रिय आणि दबंग पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे आयपीएस अधिकारी शिवदीप वामनराव लांडे यांनी गुरुवारी (१९ सप्टेंबर) अचानक राजीनामा दिल्याची घोषणा केली. शिवदीप लांडे यांनी फेसबुक अकाउंटवरून दिली आहे.
-
राजीनामा दिल्यानंतर पुढे काय करणार? याबाबत मात्र त्यांनी कोणतेही सुतोवाच केलेले नाही. “मी बिहारमध्ये १८ वर्ष काम करून सेवा दिली. बिहार माझे कुटुंब आहे. बिहारसाठी यापुढेही काम करत राहिल”, अशी पोस्ट शिवदीप लांडे यांनी लिहिली.
-
शिवदीप लांडे यांचा जन्म २९ ऑगस्ट १९७६ रोजी झाला. शेतकरी कुटुंबातून आलेल्या शिवदीप लांडे यांचे शिक्षण अकोला जिल्ह्यात झाले.
-
२००६ साली शिवदीप लांडे यांची आयपीएससाठी निवड झाली आणि त्यांना बिहार केडर मिळाले होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी बिहार सारख्या राज्यातही दबदबा निर्माण करत गुंडावर वचक बसविला होता.
-
२०१४ साली त्यांनी शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांची कन्या डॉ. ममता शिवतारे यांच्याशी विवाह केला.
-
डॉ. ममता शिवतारे या स्त्रीरोगतज्ञ आहेत. या दोघांना अऱ्हा नावाची मुलगी असून शिवदीप लांडे आपल्या कुटुंबाच्या आनंदी क्षणाचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असतात.
-
शिवदीप लांडे आपल्या यशाचे श्रेय आईला देतात. “वुमन बिहाईंड दी लायन”, असे पुस्तक त्यांनी लिहिले असून यामध्ये लहानपणीच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला आहे.
-
बालपण, आयपीएस होण्यापर्यंतचा प्रवास आणि त्यानंतरची कारकिर्द अशा तीन भागात त्यांनी पुस्तकाच्या मजकुराची मांडणी केली आहे. यामध्ये त्यांनी आपल्या आईच्या योगदानाचा उल्लेख केला आहे.
-
तीन वर्षांपूर्वी पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात लांडे यांनी आपल्या लग्नाबाबत बोलताना त्यांनी म्हटले की, माजी राज्यपाल डीवाय पाटील यांच्यामुळे माझे लग्न ठरले. त्यांनी मुलगी बघायला येण्यासाठी आग्रह केला होता, त्यानंतर माझे लग्न झाले.
-
शिवदीप लांडे यांच्या लग्नाला आता १० वर्ष झाली आहेत. लग्नाच्या वाढदिवसाला ते पत्नीसाठी पोस्ट लिहितात. तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.
-
शिवदीप लांडे आपल्या अनेक पोस्टमध्ये पत्नीचा उल्लेख गौरी या नावाने करतात. लग्नानंतर कदाचित त्यांचे नाव ममतावरून गौरी असे बदलले असावे.
-
महाराष्ट्राचा हा सुपुत्र आता पोलीस सेवेतून मुक्त झाला असला तरी समाजसेवा करत राहणार अे सुतोवाच त्यांनी केले आहे. आगामी काळात ते राजकारणात उतरणार असल्याचे सांगितले जात आहे.

शेतकऱ्याचा नाद नाय! तब्बल ५ एकरवर बांधलं जबरदस्त शेततळं; VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की