-
कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेवरील आरे – बीकेसी दरम्यानचा पहिला टप्पा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात वाहतूक सेवेत दाखल होईल असे नुकतेच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (‘एमएमआरसी’) जाहीर करण्यात आले होते.
-
पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणासाठी ४ ऑक्टोबरचा मुहूर्त धरण्यात आल्याची चर्चा होती. मात्र आता ५ ऑक्टोबरची तारीख निश्चित झाल्याचे समजते. (image credit – @MumbaiMetro3/twitter X/file pic)
-
पंतप्रधान कार्यालयाकडून ५ ऑक्टोबरवर शिक्कामोर्तब करण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या दिवशी मुंबई आणि ठाण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.(Express Photo)
-
दरम्यान आता प्रश्न उरतो तो मेट्रो ३ सुरू झाल्यानंतर तिकिट दर काय असणार?, चल तर मग याबद्दल जाणून घेऊयात.
-
मुंबईतील मेट्रो ३ या मार्गिकेवरील आरे ते बीकेसी हा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना ५० रुपये मोजावे लागणार आहेत.
-
सीप्झ स्टेशनसाठी १० रुपये आणि एमआयडिसी अंधेरीसाठी २० रुपये तिकीट दर ठेवण्यात आला आहे. तर मरोळ नाकासाठीही २० रुपयेच दर असेल. हे तिन्ही स्टेशन आरे स्टेशनपासून अनुक्रमे १.६, २.८ आणि ४.१ किमी अंतरामध्ये आहेत.
-
तर CSMIA T2, सहारा नगर, CSMIA T1 या स्टेशन्ससाठी ३० रु मोजावे लागणार आहेत. हे स्टेशन्स आरे स्टेशनपासून अनुक्रमे ५.१, ६ आणि ७.७ किमी इतक्या अंतरावर आहेत.
-
सांताक्रूझ आणि वांद्रे या स्थानकांसाठी ४० रु तिकीट दर असेल, आरे पासून ९.९ ते १०.९ इतक्या किमी अंतरावर ही स्थानके आहेत.
-
(सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित)
हेही वाचा – Navratri 2024 : यंदा नवरात्रीत गरबा खेळताना बॉलीवूडची ‘ही’ खास गाणी लावा, पाहा यादी…

माजी भाजपा नेत्याबरोबर ‘त्या’ आक्षेपार्ह व्हिडीओमध्ये दिसणारी महिला नेमकी कोण?