-
आज महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडला.
-
यावेळी पंतप्रधान मोदींची खास उपस्थिती होती. -
महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी तिन्ही नेत्यांना शपथ दिली.
-
देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
-
एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
-
तर अजित पवारांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
-
हा भव्यदिव्य शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर पार पडला.
-
यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रातील बरेच मोठे नेते, मंत्री उपस्थित होते.
-
विविध राज्यांचे मुख्यमंत्री त्याचसोबत उद्योगपती, सिनेविश्वातील कलाकारही हजर होते.
-
महायुतीचे १५,००० कार्यकर्ते यावेळी मैदानात पाहायला मिळाले.
-
दरम्यान, शपथविधी सोहळ्याच्या सुरुवातीला राष्ट्रगीत आणि राज्यगीताचे सादरीकरण झाले.
-
(सर्व फोटो साभार- एएनआय)

Pahalgam Terror: “ते मूर्ख लोक, त्यांना…” पहलगाम हल्ल्यावर एलॉन मस्क यांच्या वडिलांची प्रतिक्रिया