-
Phase 1 of Mumbai Metro’s Line 9: ‘दहिसर-मिरा-भाईंदर मेट्रो ९’ या १३.६ किमी लांबीच्या या मार्गिकेतील दहिसर-काशीगाव (Dahisar East And Kashigaon) ४.५ किमी लांबीच्या मार्गिकेवरील मेट्रो गाड्यांच्या चाचणीला (ट्रायल रन) आजपासून सुरुवात झाली.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत मिरा रोड मेट्रो स्थानकांवरून गाड्यांच्या चाचणीला सुरुवात झाली.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मेट्रो मार्ग-९, टप्पा-१, काशीगाव ते दहिसर (पूर्व)’ मेट्रोच्या तांत्रिक चाचणीचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला.
-
चाचण्या आणि उर्वरित काम पूर्ण करून सुरक्षा प्रमाणपत्र मिळवून डिसेंबरअखेर दहिसर-काशीगाव टप्पा १ वाहतूक सेवेत दाखल करण्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) (Mumbai Metropolitan Region Development Authority) नियोजन आहे.
-
दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ आणि दहिसर-गुंदवली मेट्रो ७ मार्गिकेला जोडणारी ही मार्गिका आहे.
-
१० मेट्रो स्थानकांचा समावेश असलेली ही मार्गिका टप्प्याटप्प्याने वाहतूक सेवेत दाखल करण्याचे नियोजन आहे.
-
त्यानुसार दहिसर- काशीगाव असा पहिला टप्पा सुरू करण्यात येईल.
-
मार्गिकेवरील रुळ, सिग्नल यंत्रणेचे काम पूर्ण झाले असून विद्याुत प्रवाह कार्यान्वित करण्यात आला आहे.
-
(सर्व फोटो – संखदीप बॅनर्जी, इंडियन एक्सप्रेस आणि सोशल मीडिया)

“ती जाणूनबुजून…”, एका किसिंग सीनसाठी तब्बल ३७ रिटेक, बॉलीवूड अभिनेत्याने अभिनेत्रीला धरलेलं जबाबदार