-
Significance of Narendra Modi Canada Trip: सायप्रसचा दोन दिवसांचा दौरा संपवून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कॅनडाला पोहोचले आहेत.
-
अल्बर्टातील कनानास्किस येथे होणाऱ्या ५१व्या ‘जी-७’ शिखर परिषदेत ते सहभागी होणार आहेत.
-
तीन देशांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी यांना कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी निमंत्रण दिले असल्याने सायप्रसहून ते कॅनडाला पोहोचले.
-
१७ आणि १८ जूनला ‘जी-७’ शिखर परिषद होणार असून सलग सहाव्यांदा मोदी त्यात सहभागी होत आहेत.
-
दरम्यान यावेळी विमानतळावर उतरल्यानंतर पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यात आले.
-
दरम्यान, २०२३ मध्ये खलिस्तानी फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध बिघडले आहेत.
-
त्यानंतरची ही पंतप्रधान मोदींची पहिली कॅनडा भेट असल्याने या भेटीकडे जगाचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान मोदींना २०१९ पासून सातत्याने G7 बैठकीसाठी आमंत्रित केले जाते.
-
(सर्व फोटो साभार- एएनआय)

प्रसिद्ध अभिनेत्याने घटस्फोटानंतर ९ वर्षांनी केला साखरपुडा; अमृता खानविलकर कमेंट करत म्हणाली…