-
पाळणा योजना
केंद्र सरकार व राज्य सरकारने (महिला आयोग) मिळून नोकरदार महिलांसाठी पाळणा योजना आणली आहे. -
नोकरी करत असलेल्या महिलांच्या लहान मुलांचं सुरक्षित व योग्य संगोपन व्हावं, या उद्देशानं ही योजना सुरू करण्यात आली आहे.
-
पाळणा योजनेच्या माध्यमातून लहान मुलांना पोषण, शिक्षण, सुरक्षित वातावरण देण्यात येणार आहे.
-
या योजनेच्या पहिल्या टप्प्यात ३४५ पाळणा घरं सुरू करण्यात येणार आहेत.
-
६ महिने ते ६ वर्ष या वयोगटातल्या मुलांसाठी डे केअर सुविधा देण्यात येईल.
-
३ ते ६ वर्षांच्या मुलांना पूर्व शालेय शिक्षणही देण्यात येईल. त्यांची आरोग्य तपासणी, वाढ, लसीकरण यावर इथे लक्ष दिले जाईल.
-
सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी नाश्ता अशा स्वरूपाची काळजी घेण्याची जबाबदारी या योजनेने घेतली आहे.
-
त्यामुळे आता नोकरदार मातांच्या मुलांच्या संगोपनाची जबाबदारी सरकार घेणार आहे.
-
(All Photos Source: Majhe Ghar Palnaghar And Nursery/Facebook Page) हेही पाहा- पहिली नोकरी करणाऱ्यांनी पीएफ खात्यासंबंधी ‘ही’ गोष्ट कटाक्षानं पाळा; दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”