-
गेल्या पाच दिवसांपासून मनोज जरांगे पाटलांचं आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरु आहे.
-
आज दुपारी ३ वाजेपर्यंत मुंबई व आझाद मैदान रिक्त करा अशा सुचना मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आंदोलक व जरांगे पाटलांना दिल्या होत्या.
-
दरम्यान, न्यायालयाची आजची उर्वरित सुनावणी उद्यावर गेली आहे. त्याआधी ३ वाजता आझाद मैदानावर सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला पोहोचलं आहे.
-
या मंडळामध्ये राधाकृष्ण विखे पाटील, शिवेंद्रराजे भोसले यांचा समावेश आहे.
-
मागण्यांबाबत शिष्टमंडळानं काय केलं?
१. हैदराबाद गॅझेटियरची तात्काळ अंमलबजावणीला सहमती दर्शवली. तासाभरात जीआर काढणार- जरांगे पाटील -
२. सातारा गॅझेटियरच्या अंमलबजावणीला सहमती, जीआर महिन्याभरात काढण्याचं आश्वासन
-
३. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठीचा जीआर तात्काळ काढला जाणार
-
या शिवाय आंदोलनात बळी गेलेल्या कुटुंबीयांच्या वारसांना शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी देण्याची मागणी मान्य
-
दरम्यान, जरांगे पाटलांनी वंशवळ समिती गठित करणे ज्यामध्ये मोडी, फारसी, उर्दू लिपीचे अभ्यासक असावेत ते स्वखर्चाने काम करतील असंही यावेळी सांगितलं.
-
याशिवाय, सगेसोयऱ्यांची छाननी करण्याचा मुद्द्यासह मराठा-कुणबी एक असल्याचा जीआर काढण्यास संमती
-
(सर्व फोटो- संग्रहित एक्सप्रेस फोटो) हेही पाहा- ‘या’ जीआर शिवाय मनोज जरांगे पाटलांचा मुंबई सोडण्यास नकार, म्हणाले “आझाद मैदानातून…”

Manoj Jarange Patil Maratha Reservation LIVE : सरकारकडून मागण्या मान्य, मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं