-
Bombay High Court Complex At Bandra East: वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीतील ३० एकर जागेवर मुंबई उच्च न्यायालयाची प्रशस्त अशी इमारत उभारण्यात येणार आहे.
-
मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी कंत्राटदार हफिज कॉन्ट्रॅक्टर यांनी ३७५० कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार करून उच्च न्यायालयाच्या सुकाणू समितीकडे सादर केला होता.
-
या आराखड्यावर सुकाणू समितीने शिक्कामोर्तब केले आहे.
-
आता लवकरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
-
उच्च न्यायालयाच्या या नवीन इमारतीची रचना अत्यंत आकर्षक, जुन्या-नव्या शैलीचा मिलाफ अशी असणार आहे.
-
या इमारतीत एकूण ७५ कोर्टरुम असणार आहेत.
-
आता लवकरच या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
-
प्रकल्पाच्या आराखड्यानुसार २४ एकर जागेवर न्यायालयाची मुख्य इमारत उभी राहणार आहे.
-
समोर ४ मजली, तर मागच्या बाजूस ९ मजली अशी इमारत असणार आहे. तर ४ एकर जागेवर निवासस्थाने बांधण्यात येणार आहेत.
-
एकूण ६० लाख चौरस फूट बांधकाम क्षेत्राचा (बिल्टअप एरिया) वापर करून हे संकुल उभारले जाणार आहे.
-
सहा ओव्हल मैदानाइतके हे बांधकाम क्षेत्र असणार आहे हे विशेष.
-
न्यायालयाच्या इमारतीत ७५ कोर्टरुम असणार असून दोन न्यायमूर्तींसाठी एक अशी स्वतंत्र उद््वाहके यात असणार आहेत.
-
प्रतीक्षालय, वाहनतळाची जागा, सभागृह, उपहारगृह आदी सुविधांचाही यात समावेश असणार आहे.
-
न्यायालयाच्या इमारतीची उंची ७० मीटर अर्थात २० मजली इमारती इतकी असणार आहे.
-
दरम्यान, या इमारतींचा आराखडा २५ वास्तूरचनाकारांच्या माध्यमातून तयार करण्यात आला आहे.

महिलांनो ट्रेनने प्रवास करताना सावधान; समोर बसलेल्या मुलीसोबत व्यक्तीनं काय केलं पाहा, VIDEO पाहून धक्का बसेल