-
H-1B Visa Fee Hike by Trump Administration: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इमिग्रेशन आणि व्हिसा धोरणात बदल केला आहे. अमेरिकेतील नागरिकांना अधिक रोजगार मिळावा, इतर देशांमधून अमेरिकेत येणाऱ्यांना, रोजगार मिळवणाऱ्यांना रोखण्यासाठी ट्रम्प यांनी काही कठोर पावलं उचलली आहेत. (PC : AP)
-
ट्रम्प प्रशासनाने शुक्रवारी (१९ सप्टेंबर) एक महत्त्वाचा निर्णय घेतला. याअंतर्गत एच १ बी व्हिसासाठी नवीन अटी घालण्यात आल्या आहेत. (PC : AP)
-
यापुढे एच १ बी व्हिसा प्राप्त करण्यासाठी कंपन्यांना प्रतीवर्षी १ लाख डॉलर्स म्हणजेच ८८ लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. (PC : Reuters)
-
ट्रम्प यांच्या निर्णयाचा फटका अमेरिकेतील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय नागरिकांना बसू शकतो. कारण एच १ बी व्हिसाचा सर्वाधिक फायदा भारतीयांनी घेतलेला आहे. (PC : Narendra Modi/X)
-
बिझनेस स्टँडर्डच्या एका रिपोर्टनुसार एच १ बी व्हिसाचा सर्वाधिक लाभ भारतीय घेतात. अमेरिकेने जारी केलेल्या एकूण एच १ बी व्हिसापैकी ७१ टक्के व्हिसा भारतीयांनी घेतला आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या या निर्णयाचा भारतीयांना सर्वाधिक फटका बसणार आहे. (PC : PTI)
-
याच अहवालाचा दाखला देत लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लागावला आहे. (PC : PTI)
-
राहुल गांधी म्हणाले, “मी पुन्हा एकदा सांगतो, भारताकडे सर्वात कमकुवत पंतप्रधान आहेत.” (PC : Congress/X, PTI)
-
अमेरिकेत प्रवेश मिळावा यासाठी H-1B व्हिसाची सर्वाधिक मागणी असते. हजारो भारतीय या व्हिसाद्वारे अमेरिकेत प्रवेश करतात. (AI Generated Image)
-
अमेरिकेतील कंपन्या या व्हिसाद्वारे भारतीयांसह विविध देशांमधील आयटी कर्मचाऱ्यांना अमेरिकेत आमंत्रित करतात. (PC : PTI)
-
अमेरिकेतील आयटी कंपन्यांकडून याचा जास्त वापर केला जातो. व्हाईस हाऊसच्या दाव्यानुसार, या नव्या बदलांमुळे अमेरिकन कामगारांचे संरक्षण होईल.(PC : Congress/X, PTI)

सर्वपित्री अमावस्येला ग्रहांची स्थिती कोणत्या राशींसाठी ठरणार लाभदायक? वाचा मेष ते मीनचे रविवार विशेष राशिभविष्य