-
अतिवृष्टी
सध्या राज्यात अतिवृष्टीमुळे मोठी आपत्ती उद्भवली आहे. या संकटामुळे हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास हिरावला गेला आहे. (Photo: X) -
मराठवाड्याला फटका
या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका मराठवाड्याला बसला आहे. मुसळधार संततधारेने मराठवाड्यात अनेक शेतकऱ्यांना स्थलांतरही करावे लागले व त्यांच्या शेतीपिकांसह इतर मालमत्तेचंही मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे सध्या सर्वच स्तरातून पूरग्रस्तांसाठी मदत दिली जात आहे. (Photo: X) -
मदतीचा हात
राज्य सरकारने पूरग्रस्तांसाठी तातडीने २ हजार कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. तसेच प्रभावित कुटुंबांना तात्काळ १० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. दरम्यान, या गंभीर पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक प्रमुख देवस्थानांनी पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे. राज्यातील विविध धार्मिक संस्थानांनी केलेल्या या सामूहिक मदतीमुळे आपत्तीग्रस्तांना मोठा आधार मिळाला आहे. (Photo: X) -
संत गजानन महाराज शेगाव संस्थान
यामध्ये संत गजानन महाराज शेगाव संस्थानने एक कोटी ११ लाख रुपयांची भरीव मदत जाहीर केली आहे. (फोटो- लोकसत्ता संग्रहित) -
साईबाबा संस्थान, शिर्डी
शिर्डी येथील साईबाबा संस्थाननेही पूरग्रस्तांसाठी एक कोटी रुपये इतकी आर्थिक मदत दिली आहे. (फोटो- लोकसत्ता संग्रहित) -
तुळजा भवानी मंदिर संस्थान, कोल्हापूर
तुळजा भवानी मंदिर संस्थानने अतिवृष्टीग्रस्तांसाठी एक कोटी रुपयांची मदत देऊ केली आहे. (फोटो- लोकसत्ता संग्रहित) -
विठ्ठल रुक्मिणी मंदिर, पंढरपूर
पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडूनही एक कोटी रुपये इतकी मदत जाहीर करण्यात आली आहे. (फोटो- लोकसत्ता संग्रहित) -
लालबागचा राजा गणेश मंडळ
तर लालबागचा राजा गणेश मंडळाने ५० लाखांची मदत पूरग्रस्तांसाठी जाहीर केली आहे. (फोटो- लोकसत्ता संग्रहित) -
श्री सिद्धिविनायक न्यासा
मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक न्यासाकडून पूरग्रस्तांना १० कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. ही मदत मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. (फोटो- लोकसत्ता संग्रहित) -
खाजगी, सरकारी नोकरदार
याशिवाय अनेक खाजगी, सरकारी नोकरदारांनी सामाजिक बांधिलकी जपत अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना एक दिवसाचे वेतन मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. (Photo: X) -
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार
याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या सर्व आमदार, खासदार व मंत्री यांनी एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांना दिला आहे. (Photo: X) -
भाजपा- विरोधी पक्ष आमदार
राज्यातले भाजपाचे आमदार एक महिन्याचे तर विरोधी पक्षातले आमदार त्यांचे सहा महिन्याचे वेतन पूरग्रस्तांना मदत म्हणून देणार आहेत. ही सर्व मदत मुख्यमंत्री सहायत निधीकडे वर्ग केली जाणार आहे. (Photo: X)
हेही पाहा- Asia Cup 2025: ‘मैदान कोणतेही असो, भारत जिंकणारच’; पाकविरुद्ध भारताच्या दणदणीत विजयावर नेते- अभिनेते म्हणाले….

“पाकिस्तानला शिक्षा गरजेची होती”, बुमराहच्या ‘जेट क्रॅश’ सेलिब्रेशनवर केंद्रीय मंत्र्यांची प्रतिक्रिया