-
‘जयंत पाटील हे राजारामबापू पाटील यांची अवलाद वाटत नाही’, असे वादग्रस्त विधान भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना समज दिली होती.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समज दिल्यानंतरही गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्या कुटुंबियाबद्दल वादग्रस्त विधान केले आहे.
-
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून गोपीचंद पडळकर यांच्यावर मंगळसूत्र चोर अशी टीका केली जाते. मागे जितेंद्र आव्हाड यांनीही याचप्रकारचा उल्लेख केल्यामुळे विधीमंडळाच्या परिसरातच दोन्ही आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती.
-
त्यानंतर काही दिवसांपूर्वी गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांना लक्ष्य केले होते. त्यानंतर आता पुन्हा पडळकर यांची जीभ घसरली आहे.
-
गोपीचंद पडळकर म्हणाले की, मी तुमच्या कुठल्या बायकोचे मंगळसूत्र चोरले ते सांगा. तसेच तुम्ही जातीवंत पाटील असाल तर मला तारीख आणि वेळ सांगा मी वाळ्यात येतो, असे आव्हानही पडळकर यांनी दिले.
-
जयंत पाटील यांच्या वडिलांवर केलेल्या विधानानंतर सांगलीत ठिकठिकाणी पडळकर यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. यावेळी जयंत पाटील यांचे निकटवर्तीय दिलीप पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर मंगळसूत्र चोर अशी टीका केली होती.
-
गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले, मी सुभेदार मल्हारराव यांची औलाद आहे तुम्ही जर माझ्या डोक्यात जाण्याचा प्रयत्न केला तर मी तुमच्यासाठी काळीकुट्ट अंधारमय रात्र असेल.
-
“मला गोप्या म्हटले जाते. मग मी तुम्हाला जयंत्या असे म्हटले तर चालेल का? मी वाळव्याच्या जयंत्याला आव्हान देतो की, ते जर जातीवंत पाटील असतील तर उद्या पत्रकार परिषद घेऊन मला वेळ सांगतील. माझ्याकडे मुलं पाठवायची गरज नाही, मी स्वतः तुम्ही सांगाल तिथे येतो”, असंही पडळकर म्हणाले.
-
गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले, मी फकीर माणूस आहे. मला आगा-पिछा नाही. माझी बदनामी करून मी संपणार नाही. अनेक गावठी कुत्र्यांना तुडवत तुडवत मी इथपर्यंत आलो आहे. जतमधील जनतेने मला निवडून दिले आहे. माझ्यावर टीका करणारे हिंदू विरोधी आहेत.
-
गोपीचंद पडळकर यांच्या टीकेनंतर भाजपाचे माध्यम समन्वयक नवनाथ बन यांनी त्यांचे समर्थन केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर आता काय प्रतिक्रिया देतात? हे पाहावे लागेल.

नवरात्रीचा उपवास कधी सोडावा? नेमकी तारीख, शुभ वेळ आणि पद्धत जाणून घ्या…