-
Navi Mumbai International Airport Inauguration 2025: बहुचर्चित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते बुधवारी, ८ ऑक्टोबरला होणार आहे. (सर्व फोटो सौजन्य : नरेंद्र वास्कर आणि जयेश सामंत)
-
या कार्यक्रमासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून जय्यत तयारी केली जात आहे.
-
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील सर्वात मोठ्या ग्रीनफिल्ड विमानतळ प्रकल्पांपैकी एक आहे.
-
तब्बल ११६० हेक्टर म्हणजे सुमारे २८६० एकर क्षेत्रावर हे विमानतळ उभे करण्यात आले आहे.
-
या विमानतळावर पूर्ण क्षमतेने उड्डाणांसाठी इंडिगो (Indigo), अकासा एअर (Akasa Air) आणि एअर इंडिया एक्स्प्रेस (Air India Express) या प्रमुख विमान कंपन्यांनी यामध्ये स्वारस्य दाखवले असून, ‘इंडिगो’ने पहिल्या उड्डाणासाठी आपली तयारी दर्शवली आहे.
-
आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेने नवी मुंबईतील या विमानतळाला ‘एनएमआय’ हा जागतिक सांकेतिक कोड दिला असून, आता हवाई वाहतूक व्यवहारात नवी मुंबई विमानतळाची ओळख ‘एनएमआय’ या नावाने केली जाणार आहे.
-
यानुसार तिकीट विक्री करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या प्रणालींमध्ये आधीच हे नाव अद्ययावत केले आहे.
-
नवी मुंबई विमानतळ येथून सुरुवातीला ५ लाख मेट्रिक टन कार्गो वाहतूक, तर पुढील काही वर्षांत ३२ लाख मेट्रिक टन मालवाहतुकीचे उद्दिष्ट आहे.
-
यासाठी पूर्वेकडील कार्गो टर्मिनलचे काम पूर्ण झाले असून, यामुळे महाराष्ट्रातील उद्योग, निर्यातदार आणि व्यापार क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे.

“अमिताभ बच्चन व राजेश खन्नांच्या शत्रुत्वामुळे माझे वडील दारूच्या आहारी गेले”, बॉलीवूड अभिनेत्याचे वक्तव्य