-
गौतमी पाटील ही महाराष्ट्रातील ख्यातनाम नर्तिका आहे. तिच्या डान्सच्या कार्यक्रमांना तरुणांची खूप गर्दी होत असते.
-
गौतमी पाटील ही तिच्या नृत्याच्या कार्यक्रमांसाठी जे मानधन घेते ते देखील चर्चेचा विषय ठरलं आहे.
-
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटील ही एका अपघात प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. (सर्व फोटो सौजन्य-गौतमी पाटील, इन्स्टाग्राम पेज)
-
गौतमी पाटीलच्या कारने ३० सप्टेंबरच्या पहाटे एका रिक्षाला पुण्यातल्या नवले पुलावर धडक दिली. ज्यात रिक्षाचालक गंभीर जखमी झाले.
-
गौतमी पाटीलला अटक करण्याची मागणी या प्रकरणानंतर होऊ लागली. रिक्षा चालकाच्या कुटुंबाने ही मागणी लावून धरली होती. त्यासाठी आंदोलनही झालं.
-
गौतमी पाटीलच्या नृत्याच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याचीही मागणी आंदोलन करणाऱ्यांतर्फे करण्यात आली.
-
गौतमी पाटीलला माणुसकी नाही, तिने अपघात झालेल्या रिक्षाचालकाच्या कुटुंबाची विचारपूस केली नाही, त्यांना मदत केली नाही अशी टीका होऊ लागली.
-
इतकी मोठी घटना घडूनही गौतमीला नाचाचे कार्यक्रम महत्त्वाचे वाटतात अशीही टीका तिच्यावर झाली आणि तिच्या अटकेचीही मागणी झाली.
-
मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही गौतमी पाटीलला उचला आणि सदर प्रकरणाची चौकशी करा असे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिले. मागचे सात दिवस गौतमी पाटील शांत होती.
-
अखेर मंगळवारी माध्यमांसमोर येत गौतमीने तिची भूमिका मांडली. तसंच जे काही घडलं, जी टीका झाली ती सांगत असताना ती ढसाढसा रडली.
-
अपघात झाल्याची बातमी ऐकून मला खूप वाईट वाटलं. मी त्या कारमध्ये नव्हते. पण तरीही मला ट्रोल करण्यात आलं आणि जे मी केलेलं नाही त्याचेही आरोप माझ्यावर झाले असं गौतमी म्हणाली.
-
अपघाताची बातमी मी जेव्हा ऐकली तेव्हा मी तिथे नव्हते. मी वेगळ्या ठिकाणी होते. पोलिसांना मी त्याबाबतची सगळी माहिती दिली आहे असंही गौतमीने माध्यमांना सांगितलं.
-
गौतमी पाटीलने हेदेखील सांगितलं की ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशीच रिक्षाचालकाच्या कुटुंबाला मदत मी माझ्या भावाकडून पाठवली होती. पण त्यांनी ती मदत नाकारली असंही गौतमीने सांगितलं.
-
गौतमीने असंही सांगितलं की रिक्षा चालकाच्या कुटुंबाने असंही सांगितलं की जे काय करायचं आहे ते कायदेशीर मार्गाने करायचं आहे. मी त्यांना भेटू शकले नाही हे खरं आहे. कारण नृत्याच्या कार्यक्रमांसाठी अॅडव्हान्स घेतलेला असतो. ते कार्यक्रम असे थेट रद्द करता येत नाहीत.
-
गौतमी पाटीलने असंही सांगितलं की आपण त्या कुटुंबाची भेट आता घेणार नाही. याचं कारण म्हणजे जी काही टीका झाली, जे ट्रोलिंग झालं त्यामुळे मी खूप व्यथित झाले आहे. त्यामुळे मी त्यांना भेटणार नाही. अशी भूमिका आता गौतमीने घेतली आहे.

Gautami Patil : “अपघाताबाबत वाईट वाटलं पण रिक्षाचालकाच्या कुटुंबाला भेटणार नाही, कारण…”; गौतमी पाटीलने ढसाढसा रडत काय सांगितलं?