-
क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा यांनी गुजरातच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली आहे. हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
-
रिवाबा यांचा राजकीय प्रवास २०१९ मध्ये भाजपा प्रवेशानंतर सुरू झाला. असे असले तरी त्यांचे कुटुंबीय गेल्या अनेक दशकांपासून काँग्रेस पक्षाशी संबंधित आहेत.
-
२०२२ मध्ये रिवाबा जडेजा जामनगर उत्तर मतदारसंघातून पहिल्याच प्रयत्नात त्या आमदार म्हणून विजयी झाल्या होत्या.
-
२०२२ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत त्यांनी आम आदमी पक्षाच्या करशनभाई यांच्याविरोधात एकूण ८८,८३५ मते मिळवली होती.
-
भाजपात प्रवेश करण्यापूर्वी रिवाबा जडेजा राजपूत संघटना करणी सेनेच्या सदस्या होत्या. २०१८ मध्ये करणी सेनेने संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ या चित्रपटात आक्षेपार्ह मजकूर असल्याचा आरोप करत मोठे आंदोलन केले होते, तेव्हा त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. त्याच वर्षी त्यांना करणी सेनेच्या महिला अध्यक्षा म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
-
रिवाबा जडेजा यांच्या भाजपामधील प्रवेशाच्या चर्चा सुरू असताना, रवींद्र जडेजा आणि रिवाबा यांनी नोव्हेंबर २०१८ मध्ये दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. पुढच्या वर्षी, मार्च २०१९ मध्ये रिवाबा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता.
-
इतक्या प्रसिद्ध क्रिकेटपटूची पत्नी असूनही, रिवाबा यांनी जामनगरमध्ये महिलांसाठी केलेल्या कामातून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
-
२ नोव्हेंबर १९९० रोजी राजकोट येथे जन्मलेल्या रिवाबा पहिल्यापासून सामाजिक कार्याशी संबंधित कुटुंबातील आहेत. मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या रिवाबा यांना सरकारी नोकरी मिळवायची होती. पण, आता त्यांना थेट सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे.
-
२०१६ मध्ये रिवाबा यांचे क्रिकेटपटू रवींद्र जडेजाशी लग्न झाले. रिवाबा आणि रवींद्र जडेजाचे राजकोटमध्ये रेस्टॉरंटही आहे. त्यांना निध्याना नावाची एक मुलगी आहे. (All Photos: @imjadeja/X)
“मी धर्मेंद्र यांच्या भावाला भेटल्यावर ३ दिवसांनी त्यांना गोळ्या घातल्या होत्या”, युवराज सिंगच्या वडिलांचे वक्तव्य