-
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे कुटुंबाची एकत्र झलक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे. आदित्य ठाकरे यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोत कुटुंबातील ऐक्याचे सुंदर दर्शन घडते.
-
शिवतीर्थावर उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे व तेजस ठाकरे हे दीपोत्सव कार्यक्रमात सहभागी झाले होते.
-
शिवाजी पार्कवरील मनसेने आयोजित केलेल्या दीपोत्सवाच्या निमित्ताने ठाकरे पुन्हा एकदा एकत्र आले. काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या दीपोत्सवाचे उदघाटन झाले.
-
या खास फोटोंमध्ये आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, तेजस ठाकरे, मिताली ठाकरे व उर्वशी ठाकरे यांनी एकत्र पोज दिली असून, कुटुंबातील ऐक्याचं प्रतीक म्हणून ही झलक ओळखली जाते.
-
अमित ठाकरेंनी या कार्यक्रमादरम्याचे फोटो शेअर केले आहेत. उद्धव ठाकरे व राज ठाकरे या दोघांचा एकत्र फोटो शेअर केला गेला आहे.
-
“क्षण आनंदाचा, सण नात्यांचा ठाकरे कुटुंबीयांकडून सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!” अशी कॅप्शन अमित ठाकरे यांनी फोटोंना दिली आहे.
-
या कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरे यांनी लाल रंगाचा कुर्ता परिधान केला होता; तर अमित ठाकरे यांनी निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता.
-
या दिवाळीत ठाकरे कुटुंबाच्या या एकत्र फोटोशूटने ऐक्य, स्नेह आणि नव्या सुरुवातीचा संदेश देत मराठी माणसाच्या मनात एक वेगळी ऊब निर्माण केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : आदित्य ठाकरे/इन्स्टाग्राम)

पाकिस्तानी हवाई हल्ल्यात ३ अफगाण क्रिकेटपटूंचा मृत्यू, रशीद खानने व्यक्त केला संताप; म्हणाला…