-
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज गोरेगाव येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित केलं. यावेळी त्यांनी निवडणूक याद्यांमधील घोळांवर भाष्य केलं. (सर्व फोटो सौजन्य-राज ठाकरे, एक्स पेज)
-
मला तर कळलं आहे की आत्ताच्या निवडणुकांसाठी १ जुलैला निवडणुकांसाठी यादी बंद केली आहे. जवळपास ९६ लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरले आहेत. मुंबईत ८ ते साडेआठ लाख मतदार, ठाण्यात, पुण्यात अशा प्रत्येक ठिकाणी भरले आहेत. अशा निवडणुका होणार आहेत तर मग प्रचार कशाला करायचा? असा सवाल राज ठाकरेंनी केला.
-
मला आणखी एक गोष्ट समजत नाही. आम्ही या सगळ्या घोळांबाबत निवडणूक आयोगाला प्रश्न विचारत आहोत. असं असताना सत्ताधारी पक्षांना राग का येतो आहे? कारण त्यांना माहीत आहे त्यांनी काय केलं आहे असंही राज ठाकरे म्हणाले
-
आपल्या भाषणाच्या दरम्यान राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी यांचा जुना व्हिडीओ पोस्ट केला. मोदी मुख्यमंत्री असताना त्यांनी निवडणूक आयोगाला मतदार याद्यांवरुन इशारा दिला होता असा आशय या व्हिडीओत होता. यावरुन तो व्हिडीओ लावत राज ठाकरेंनी मी वेगळं काय म्हणतो आहे? असा सवाल केला.
-
मुंबई, ठाण्यात होणारी प्रगती मराठी माणसाच्या थडग्यावर होणार असेल तर ते मी खपवून घेणार नाही. यांना (भाजपा) महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातली शहरं अदाणी आणि अंबानी यांच्या दावणीला बांधायची आहेत. असाही आरोप राज ठाकरेंनी केला.
-
रस्ते होत आहेत, विकास होतोय वाटत असेल तर ते तुमच्यासाठी नाही. जे उद्योजक जमिनी विकत घेत आहेत त्यांच्यासाठी आहे. जिथे नजर पडेल ते पाहिजे आहे त्यांना. आमचीच मराठी माणसं यांना जमिनी मिळवून देत आहेत. आमची मराठी माणसं दलाल म्हणून यांच्यासाठी कामं करत आहेत. असंही राज ठाकरे म्हणाले.
-
महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारांना माझी विनंती आहे सतर्क राहा. यादी प्रमुखांना मी बोलवलं आहे. सगळ्यांना माझी विनंती आहे की आमचे लोक येतील आणि इतर पक्षांचे लोक येतील त्यांना सहकार्य करा. एक एक घरात आठशे माणसं, सातशे माणसं भरली जात आहेत. जे मतदार नाहीत त्यांची खोटी नावं भरुन निवडणुकांना सामोरं जायचं म्हणत आहेत. हे जोपर्यंत मतदार याद्या पूर्णपणे स्वच्छ होत नाही. सगळ्या पक्षांचं समाधान होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात निवडणुका घेऊनच दाखवा. असा इशाराही राज ठाकरेंनी दिला.

वेगवान’ वंदे भारत एक्स्प्रेसचा सहा तास विलंबाने प्रवास; ऐन दिवाळीत गावी जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल…