
आपल्या आईच्या पाठीवर स्वार होऊन खेळताना माकडाचे पिल्लू. (छायाः पीटीआय) 
लटेहार येथे व्यापाराचा खून झाल्यानंतर आक्रमक झालेल्या लोकांनी तेथील गाड्या पेटवल्या. (छायाः पीटीआय) 
नवी दिल्लीतील रैसिना हिल येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाची तयारी करताना कामगार. (छायाः पीटीआय) -
पहिल्या पावसात रांची शहरांतील रस्त्यांवर पाणी तुंबणे नेहमीचेच. सोमवारी वाहनचालकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागत होती.(छायाः पीटीआय)
-
छगन भुजबळ यांच्या मुंबईतील सांताक्रुझ, दादर, शिवाजी पार्क येथील निवासस्थानी आणि कार्यालयांवर मंगळवारी छापे टाकण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबईतील अधिकाऱयांनी हे छापे टाकले. एकूण २० ते २५ अधिकारी या छापेसत्रात सहभागी झाले होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. (छाया-दिलीप कागडा)
-
मुंबईतील वरळी सीफेसवर उंचच उंच लाटांची मजा लुटणारे कुटुंब. (छाया-केविन डिसूझा)
-
मुंबईतील शिवाजी पार्क येथे आकाशात रंगीबेरींगी छत्र्या लावण्यात आल्या आहेत. त्यांचे रंग आणि मांडणी पाहून अनेकांना छायाचित्र काढण्याचा मोह आवरता येत नसून, तरूण-तरूणांनी येथे सेल्फीसाठी गर्दी केल्याचे दिसते. (छाया-वसंत प्रभू)
-
जर्मनीतील बर्लीन येथे सायबेरीयन वाघाचे हे बछडे सध्या सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहेत. (छाया- एपी/पीटीआय)
भारताने विश्वचषक जिंकून २४ तासही झाले नाहीत त्याआधीच कर्णधार हरमनप्रीतच्या राजीनाम्याची मागणी; माजी कर्णधार म्हणाल्या…